AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वर्षांनंतर हरवलेल्या तरुणाचा गटारात सापडला हाडांचा सापळा, बाहेर काढताच… पोलिसांचाही थरकाप उडला

एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. पाच वर्षांपूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा सांगाडा एका गटारात सापडला आहे. जेव्हा तो बाहेर काढण्यात आला तेव्हा पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली.

5 वर्षांनंतर हरवलेल्या तरुणाचा गटारात सापडला हाडांचा सापळा, बाहेर काढताच... पोलिसांचाही थरकाप उडला
CrimeImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 19, 2025 | 1:40 PM
Share

एक धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला आहे. ५ वर्षे जुने हत्या प्रकरण १५ सप्टेंबरला पुन्हा चर्चेत आले होते. बेपत्ता झालेल्या तरुणाच्या आईने पोलिसांवर तपासात दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आत्महत्येची धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीने सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांच्या तपासाला वेग आला आणि आरोपीला शोधण्यास सुरुवात केली. आता पोलिसांनी मोठा खुलासा करत सांगितले आहे की, बडोनी तहसील क्षेत्रातील गोविंदा रावतची हत्या झाली होती. या प्रकरणात त्याचा खास मित्र हनुमंत रावत हाच आरोपी असल्याचे सांगितले गेले आहे.

पोलिसांनी सांगितले की, मैत्रीचा खोटा विश्वास आणि नोकरीचा बहाणा बनवून हनुमंतने गोविंदाची हत्या केली आणि मृतदेह गटरात टाकून सिमेंटने झाकून ठेवला. सुरुवातीला पोलिस या प्रकरणात निष्काळजी करत होते. पण जेव्हा आई कमला रावतने पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येची धमकी दिली त्यानंतर बडोनी पोलिस सक्रिय झाले. एसडीओपी बडोनी विनायक शुक्ला यांनी प्रकरण स्वतः हातात घेतले. मुखबिराच्या मदतीने हनुमंत रावतला इंदूरमधून पकडण्यात आले आणि त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये मृतदेहाचा सांगाडा सापडला.

वाचा: गुरू गोचरामुळे या 3 राशींना होईल महालाभ, मिळणार कुबेरांचा आशीर्वाद

बहिणीला त्रास देणाऱ्याला माफी नाही

एडीएसपी दतिया सुनील शिवहरे यांनी सांगितले की, हनुमंत रावत ४-५ वर्षे पोलिसांच्या नजरेस येऊ न देता राहिला आणि कदाचित त्याला वाटले असेल की कायदा त्याच्यामागे येणार नाही. पण शेवटी न्यायाने त्याला पकडले. पोलिसांनी सांगितले की, मैत्रीच्या विश्वासात गोविंदाला कळले नव्हते की त्याचा मित्रच त्याची हत्या करू शकतो. दुसरीकडे हनुमंतचे म्हणणे आहे की त्याने आपल्या बहिणीला त्रास देणाऱ्याला रस्त्यातून हटवले आहे. आरोप आहे की मृतक गोविंदा मुलींना त्रास देत असे. त्याने आपल्या मित्राच्या बहिणीलाही त्रास दिला होता.

हत्येनंतर नाव आणि पत्ता बदलला

पोलिसांनी सांगितले की, इंदूरमध्ये हनुमंत रावत अतिशय चालाकीने आपले नाव आणि ओळख बदलून राहत होता. त्याने अनेक प्रकारे आपली ओळख बदलण्याचा प्रयत्न केला होता. हनुमंत रावतने आपल्या मैत्रीला मृत्यूच्या दारात ढकलले होते. आता तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी केली जात आहे.

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.