वयाच्या ६० व्या वर्षी भेटली बालपणीची गर्लफ्रेंड, वकीलाच्या बायको-मुलांना कळताच… जे घडलं ते ऐकून चकीत व्हाल

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वयाच्या 60व्या वर्षी पहिलं प्रेम समोर आलं आणि सर्व काही बदललं. आता नेमकं काय घडलं वाचा...

वयाच्या ६० व्या वर्षी भेटली बालपणीची गर्लफ्रेंड, वकीलाच्या बायको-मुलांना कळताच... जे घडलं ते ऐकून चकीत व्हाल
Crime
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 23, 2025 | 2:21 PM

बिहारच्या पूर्णियामध्ये असं काही घडलं की सगळ्यांचे डोळे चक्रावले आहेत. असे म्हणतात ना, पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही तसच काहीसं घडलं आहे. या पहिल्या प्रेमाच्या आठवणी मग कितीही वर्षं गेली तरी मनात कायम ताज्या राहतात. अशीच एक प्रेमकहाणीत समोर आली आहे. पण यात एक असा ट्विस्ट आला जो ऐकून सगळे चक्रावून गेले.

बालपणीचं प्रेम पुन्हा जागलं

खूप वर्षांपूर्वी एक मुलगा आणि मुलगी एकमेकांचे बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड होते. ते एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडाले होते. पण घरच्यांना हे नातं मान्य नसल्यामुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते आयुष्यात पुढे गेले आणि लग्न केले. कित्येक वर्ष उलटली, दोघांना मुलं झाली आणि दोघंही आपापल्या कुटुंबात सुखानं राहत होते. पण अचानक एक दिवस या दोघांची पुन्हा भेट झाली आणि सगळं बदललं.
वाचा: माझ्या बायकोचे 4 बॉयफ्रेंड, मोठ्या मुलाला…; पोस्टरवर दुखः, वैतागलेल्या पती थेट कलेक्टरकडे

हा ६० वर्षांचा वकील आणि ती ५० वर्षांची डॉक्टर. जेव्हा हे दोघे भेटले, तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. जुने दिवस आठवले आणि दोघंही इमोशनल झाले. बोलणं सुरू झालं आणि मग काय, जुनं प्रेम पुन्हा जागं झालं. पण ही गोष्ट त्या डॉक्टर बाईच्या नवऱ्याला, जो स्वतःही डॉक्टर आहे त्याला कळली. त्यानं या नात्याला विरोध केला, पण तरीही हे दोघं चोरून भेटायला लागले.

प्रेमासाठी पळून गेले

एक दिवस असं झालं की ही डॉक्टर बाई आपल्या वकील प्रियकरासोबत पळून गेली. तिच्या नवऱ्याला जेव्हा ही बातमी कळली, तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यानं लगेच पोलिसांत वकीलाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याला मुलंही आहेत – दोन मुलं एमबीबीएस शिकत आहे आणि एक मुलगी स्पर्धा परिक्षांची तयारी करते आहे. त्याचे म्हणणं आहे की, बायकोच्या या कृत्यानं समाजात त्याची बदनामी होते आहे. तसेच मुलांवरही वाईट परिणाम होत आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याने वकीलाला घरी येण्यापासून अनेकदा रोखलं होतं. पण तो क्लिनिकला गेल्यावर हा वकील घरी यायचा. यावरून बायकोशी अनेकदा भांडणंही झाली. मुलं मध्यस्थी करून समजावायची. पण यावेळी तर बायकोनं हद्दच पार केली आणि प्रियकरासोबत पळून गेली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे वकील आणि डॉक्टर बाई दिल्लीत एकत्र शिकायचे तेव्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं, म्हणून त्यांची लग्नं वेगवेगळ्या ठिकाणी झाली. डॉक्टर बाईला डॉक्टर नवरा मिळाला आणि वकीलालाही त्याची बायको. पण तरीही त्यांचं प्रेम मनात कुठेतरी जिवंत होतं.

पुन्हा भेट आणि पुन्हा प्रेम

एक दिवस अचानक ही भेट झाली आणि जुन्या आठवणींनी त्यांचं प्रेम पुन्हा पेटलं. डॉक्टर बाईचा नवरा जेव्हा क्लिनिकला गेला, तेव्हा ती आपल्या वकील प्रियकरासोबत पळून गेली. दोघांच्या कुटुंबांना जेव्हा हे कळलं, तेव्हा सगळेच अवाक झाले. ही हायप्रोफाइल केस असल्याने पोलिसांनी लगेच कारवाई केली. त्यांनी दोघांचे मोबाइल सर्व्हिलन्सवर टाकले आणि अवघ्या २४ तासांत त्यांना शोधून काढले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आणि नंतर दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमध्ये समजुतीने प्रकरण मिटले.

आता पुढे काय?

आता ही प्रेमकहाणी पूर्णिया आणि आसपासच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. लोकं याबद्दल गप्पा मारत आहेत आणि ही अनोखी लव्हस्टोरी सगळ्यांना आश्चर्यचकित करत आहे. प्रेम कधीच मरत नाही, पण कधी कधी ते असं वादळ घेऊन येतं की सगळंच विस्कटून जातं. तरीही, शेवटी सगळं मिटलं, पण ही कहाणी लोकांच्या मनात बराच काळ राहणार आहे.