
उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणीच्या व्हॉट्सअॅपवर एक संदेश आला होता. या संदेशमध्ये जर बहीण परत हवी असेल तर 50 हजार रुपये द्यावे लागतील असे म्हटले होते. हा संदेश पाहून ती तरुणी प्रथम चकित झाली. तिला वाटले की तिच्या बहिणीचे अपहरण झाले आहे. मात्र, नंतर ही कहाणी काही वेगळीच असल्याचे समोर आले.
खोट्या अपहरणाची योजना
एका तरुणीने स्वतःच्या अपहरणाची खोटी कहाणी रचून आपल्या कुटुंबीयांना फसवले. ही तरुणी एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करते. तिला तिच्या मित्राच्या बहिणीच्या लग्नाला जायचे होते, पण तिच्या कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली होती. त्यामुळे तिने एक योजना आखली. जेणे करुन ती लग्नाला जाऊ शकेल.
वाचा: नवरदेवाचे हात पाहिले अन् नवरीची सटकलीच, भर मंडपात घडवली जल्माची अद्दल; तुम्हीही व्हा सावध
अपहरणाचा बनावट संदेश
शनिवारच्या संध्याकाळी ती शाळेत जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तिने फोन करून फक्त एवढेच सांगितले की, ती घरी येत आहे आणि नंतर कॉल कट केला. काही वेळातच तिच्या बहिणीच्या मोबाइलवर एक संदेश आला, ज्यामध्ये लिहिले होते की, तिचे अपहरण झाले आहे आणि तिला सोडवायचे असेल तर 50 हजार रुपये द्यावे लागतील. तसे न केल्यास तिच्या जीवाला धोका असल्याचे सांगण्यात आले.
कुटुंबाची धावपळ आणि पोलिसांचा तपास
हा संदेश मिळताच कुटुंबात गोंधळ उडाला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तरुणीचा मोबाइल सर्व्हिलन्सवर टाकला, ज्यामुळे तिची शेवटची लोकेशन बाराबंकी रेल्वे स्टेशनवर आढळली. पोलीस जेव्हा स्टेशनवर पोहोचले, तेव्हा ती तरुणी तिथे प्लॅटफॉर्मवर बसलेली आढळली.
काय आहे?
पोलिसांनी तरुणीला ठाण्यात आणून चौकशी केली, तेव्हा तिने खरे सांगितले. तिने कबूल केले की, तिने हे सर्व स्वतःच नियोजित केले होते. कारण तिला लग्नाला जायचे होते. कुटुंबीयांनी परवानगी नाकारल्यामुळे तिने अपहरणाचा खोटा ड्रामा केला. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून समज दिली आणि नंतर तिला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.