AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाचे हात पाहिले अन् नवरीची सटकलीच, भर मंडपात घडवली जल्माची अद्दल; तुम्हीही व्हा सावध

मिर्झापूर जिल्ह्यातील कछवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नवरदेवाने सुहागरात्रीच्या दिवशी आपल्या नववधूला कोल्ड्रिंकमध्ये बिअर आणि ठंडाईत भांग टाकून पाजले. याची माहिती मिळताच नवरीने पोलिसात तक्रार दाखल केली आणि लग्न मोडण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नवरदेवाचे हात पाहिले अन् नवरीची सटकलीच, भर मंडपात घडवली जल्माची अद्दल; तुम्हीही व्हा सावध
CrimeImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 25, 2025 | 4:15 PM
Share

उत्तर प्रदेशातील महाराजपूर येथे एक लग्न मोडलं आहे. लग्नाच्या मंडपातच हे लग्न मोडण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू आहे. नवरदेव नवरीच्या गळ्यात वरमाला टाकत असताना नवरीची नजर नवरदेवाच्या हातावर पडली. त्यानंतर तिने, मी लग्न करणार नाही, असं लगेच सांगितलं. नवरदेवाला वरमालाही टाकू दिली नाही. नवरीचे हे शब्द ऐकल्यावर लग्नाला आलेले वऱ्हाडी चाटच पडले. प्रत्येकजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागला. नवरी असं का म्हणाली म्हणून कुजबूज सुरू झाली. त्यानंतर वर आणि वधू पक्षात वादावादी सुरू झाली. पंचायत बसली. अनेक तास चर्चा, वाद घडला. अनेक तास ड्रामा झाल्यावरही काहीच मार्ग निघाला नाही. अखेर नवरदेवाला वरात घेऊन नवरीशिवाय जावं लागलं. शेवटपर्यंत लग्न लागलंच नाही. असं काय घडलं?

महाराजपुरातील एका गावातील तरुणीचं लग्न शिवली क्षेत्रातील एका तरुणााशी ठरलं होतं. शुक्रवारी संध्याकाळी वाजत गाजत वरता नवरीच्या दारात आली. त्यामुळे नवरीच्या घरच्यांनी वराकडच्यांचा मानपान केला. त्यांची उठबस केली. लग्नाचा विधी सुरू झाला. मंत्रपठण झाले. पण जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली तेव्हाच खेळ खल्लास झाला. नवरदेव वरमाला घालण्यासाठी स्टेजवर उभा राहिला. नवरीला वरमाला घालणार तोच नवरीची नजर त्याच्या हाताकडे गेली. नवरदेवाचे हात थरथर कापत होते. त्यावेळी नवरी लगेच म्हणाली, थांबा… नवरीने नवरदेवाला तुझे हात का थरथर कापत आहेत, असं विचारलं. त्यावर नवरदेव गप्प राहिला. तेव्हा नवरदेवाचे घरच्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. नवरदेव घाबरला आहे. त्यामुळे त्याचे हात थरथरत आहेत, असं नवरदेवाच्या घरच्यांनी सांगितलं. पण नवरी काही ऐकायला तयार नव्हती. वाचा: नवरीला कोल्ड्रिंकमध्ये बिअर टाकून पाजली अन् खेळ खल्लास, सुहागरातीला काय घडलं?

मी लग्नच करणार नाही

नवरदेवाच्या घरच्यांनी दिलेलं कारण काही पटलं नाही. त्यामुळे नवरीने टोकाचा निर्णय घेतला. मी याच्याशी लग्न करणार नाही. एक तर याला कोणता तरी रोग आहे किंवा याने दारू ढोसली आहे, असं नवरीने स्पष्टपणे सांगितलं. त्यावर, वरात आली तेव्हा मानसन्मान करतानाही नवरदेवाचे हात थरथरत होते, असं नवरीच्या घरच्यांनी सांगितलं. हे घाबरण्याचे लक्षण नाहीत. नवरदेवाने दारू ढोसली आहे, असं नवरीच्या घरच्यांनी ठासून सांगितलं. नवरीच्या घरच्यांनी चोरी पकडल्यानंतर नवरदेवाकडचे लोक संतापले. त्यांनीही वाद घालायला सुरुवात केली. जोरदार वादावादी झाली. त्यानंतर हे प्रकरण थेट पंचायतीत गेलं. लग्नाच्या मंडपातच पंचायत बसली. नवरदेव आणि नवरीच्या घरच्यांनी बरीचा वादावादी केली. एकमेकांना समजावण्याचा प्रयत्न झाला. माफी मागितली गेली. यात अनेक तास गेले. पण नवरीच्या घरचे काही ऐकले नाही. खास करून नवरीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

दारू ढोसली, नशा उतरली

शुक्रवारी संध्याकाळी लग्नातच वाद सुरू झाला. तो शनिवारी सकाळपर्यंत चालूच होता. दोन्ही पक्षांमध्ये पंचायतीने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. अनेक बुजुर्ग मंडळीही आली. त्यांनीही समजावून पाहिलं. पण नवरी काही ऐकेना. शेवटी पंचायतीने दोन्ही पक्षांना तुम्ही एकमेकांना दिलेली देवाणघेवाण परत करण्याच्या सूचना केल्या. लग्न मोडलं गेलं. दोघांनीही एकमेकांना दिलेले पैसे आणि सोने परत केले. नवरदेवाची वरात नवरीशिवाय परत गेली. नवरदेवाची नशा आता उतरली होती. पण या नशेची चर्चा गावात अजूनही झिंगत आहे.

अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.