AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कलमांतर्गत सगळे गुन्हे मागे घ्या, सुप्रीम कोर्टाचा राज्यांना स्पष्ट आदेश

संगणक आणि अन्य उपकरणांचा वापर करुन सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 66 अ या कलमाबाबत न्यायालयाने निर्णय दिला.

'या' कलमांतर्गत सगळे गुन्हे मागे घ्या, सुप्रीम कोर्टाचा राज्यांना स्पष्ट आदेश
'या' कलमांतर्गत सगळे गुन्हे मागे घ्याImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Sep 07, 2022 | 2:27 AM
Share

नवी दिल्ली : सोशल मीडियात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट (Offensive Post) केल्याप्रकरणी अडचणीत सापडलेल्या लोकांना सर्वोच्च न्यायालया (Supreme Court)ने मंगळवारी दिलासा (Relief) दिला. संगणक आणि अन्य उपकरणांचा वापर करुन सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 66 अ या कलमाबाबत न्यायालयाने निर्णय दिला. कलम 66 अ अंतर्गत दाखल केलेले सगळे गुन्हे तीन आठवड्यांच्या आत मागे घ्या, असा स्पष्ट आदेश सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या खंडपीठाने राज्यांना दिला आहे.

2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केले होते हे कलम

सात वर्षांपूर्वी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 अ या कलमाच्या संवैधानिक वैधतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापुढे उपस्थित झाला होता. या कलमांतर्गत शिक्षेवर अनेकांनी आक्षेप घेतला होता. त्याप्रकरणातील पक्षकार आणि सरकारची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने 2015 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ’66 अ’ रद्द केले होते. त्याचवेळी न्यायालयाने राज्यांना या कलमांतर्गत गुन्हे दाखल न करण्याचे आदेश दिले होते.

ही गंभीर चिंतेची बाब – न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने 2015 मध्ये दिलेल्या आदेशानंतरही अनेक राज्यांमध्ये अजूनही ’66 अ’ या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले जात आहेत. याबाबत सरन्यायाधीश लळीत यांच्या खंडपीठाने तीव्र चिंता व्यक्त केली. ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे मत सरन्यायाधीश उदय लळीत आणि न्यायमूर्ती एस. रविंद्र भट यांच्या खंडपीठाने व्यक्त केले.

याचवेळी राज्यांना संबंधित गुन्हे मागे घेण्यासाठी निर्वाणीचा इशारा दिला. संबंधित सगळे गुन्हे तीन आठवड्यांच्या आत मागे घ्या, असा अल्टीमेटम न्यायालयाने राज्यांच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची होती तरतूद

रद्द केलेल्या 66 अ या कलमानुसार सोशल मीडियामध्ये आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्‍या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद होती. या कलमाचा जनतेच्या अधिकारावर थेट परिणाम होतो, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने 24 मार्च 2015 रोजी हे कलम रद्द केले होते.

रद्द केलेल्या कलम 66 अ अंतर्गत कुठेही चौकशी किंवा खटला सुरु आहे का, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधावा, तसेच याबाबत तीन आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.