Ulhasnagar Accident : बहिणीला कॉलेजला सोडून दुचाकीवरुन घरी परतत होता तरुण, अचानक समोर टँकर आला अन्…

उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील वेदांता कॉलेजमध्ये आपल्या बहिणीला सोडण्यासाठी एक तरुण दुचाकीवर आला होता. बहिणीला कॉलेजमध्ये सोडून तरुणाने घरी परतण्यासाठी दुचाकी सुरु केली आणि मागे वळत होता.

Ulhasnagar Accident : बहिणीला कॉलेजला सोडून दुचाकीवरुन घरी परतत होता तरुण, अचानक समोर टँकर आला अन्...
उल्हासनगरमध्ये बाईक आणि टँकरचा अपघातImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 9:53 PM

उल्हासनगर : बहिणीला कॉलेजला सोडून घरी परतत असलेल्या तरुणासमोर अचानक टँकर आल्याने दुचाकी धडकल्याची थरारक घटना उल्हासनगरमधील कॅम्प 3 मध्ये घडली आहे. मात्र दैव बलवत्तर म्हणून तरुण या अपघातात सुखरुप बचावला आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. उल्हासनगरमधील वेदांता कॉलेजजवळ ही थरारक घटना घडली. अपघातात तरुण विरुद्ध दिशेला पडल्याने बचावला आहे. अपघाताची घटना पाहून काळजात धस्स झाल्याशिवाय राहणार नाही. घटनेनंतर टँकर चालक गाडी घेऊन निघून गेला.

बहिणीला कॉलेजमध्ये सोडून घरी परतत होता

उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील वेदांता कॉलेजमध्ये आपल्या बहिणीला सोडण्यासाठी एक तरुण दुचाकीवर आला होता. बहिणीला कॉलेजमध्ये सोडून तरुणाने घरी परतण्यासाठी दुचाकी सुरु केली आणि मागे वळत होता.

अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद

तितक्यात अचानक मागून भरधाव टँकर आला अन् दुचाकीला धडकला. या धडकेत तरुण विरुद्ध दिशेला पडला तर दुचाकी टँकरच्या चाकाखाली आली. तरुणाला यात फारशी इजा झाली नाही. केवळ दैव बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला. ही सर्व घटना कॉलेजच्या बाहेरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.