AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात राष्ट्रवादी माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, वारजे पोलिसांची कारवाई

भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करणे, कामगारांना मारहाण करणे राष्ट्रावदी कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. हा नगरसेवक खासदार सुप्रिया सुळे यांचा निकटवर्तीय मानला जातो.

पुण्यात राष्ट्रवादी माजी नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल, वारजे पोलिसांची कारवाई
सचिन दोडकेImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 23, 2023 | 11:48 AM
Share

पुणे / अभिजीत पोते : भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि बांधकाम कामगारांना शिवागाळ करणे आणि धमकावणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराला चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोडके यांच्यासह 5-6 कार्यकर्त्यांवर मारहाण तसेच शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. वारजे पोलीस ठाण्यात भाजपच्या एका कार्यकर्त्यांने फिर्याद दिली आहे. या पार्श्वभूमीवर दोडके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोडके हे खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय

सचिन दोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकवर्तीय म्हणून ओळखले जातात. दोडके यांनी 2019 ला खडकवासला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. गेली अनेक वर्ष दोडेक पुणे शहरातील वारजे भागात ते नगरसेवक आहेत.

काय आहे प्रकरण?

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता वारजे भागात असलेल्या आरएमडी कॉलेज ते साई सयाजी नगर येथे एक अंडरपस (बोगदा) आहे. त्या ठिकाणी खडकवासला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून काही विकासकाने चालू आहेत.

या ठिकाणी सचिन दोडके, संजय दोडके आणि त्यांचे इतर कार्यकर्ते पोहचले. यानंतर दोडके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच संजय दोडके यांनी हातात बांबू घेऊन फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तेथे काम करत असलेल्या कामगारांनासुद्धा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे.

Follow Us
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी