.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरगुती वादातून डॉक्टर पत्नीची हत्या केली, मग बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली; अखेर ‘असा’ उघड झाला बनाव

पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी डॉक्टरने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह 400 किमी दूर नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.

घरगुती वादातून डॉक्टर पत्नीची हत्या केली, मग बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली; अखेर 'असा' उघड झाला बनाव
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Dec 14, 2022 | 7:02 PM
Share

लखीमपूर : वैवाहिक वादातून एका डॉक्टरने आपल्या वडिलांच्या मदतीने डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी डॉक्टरसह त्याच्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी डॉक्टरने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पत्नीचा मृतदेह 400 किमी दूर नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. अखेर 16 दिवसांनंतर हत्येचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले.

2014 मध्ये झाला होता विवाह

मयत डॉ. वंदना शुक्ला यांचा विवाह 2014 मध्ये डॉ. अभिषेक अवस्थीसोबत झाला होता. लग्नानंतर सीतापूर रोडवर स्वतःचे गौरी चिकित्सालय नावाचे रुग्णालय सुरु करुन दाम्पत्य प्रॅक्टिस करत होते.

दोघांमध्ये वैवाहिक वाद होते

मात्र काही दिवसांनंतर दोघांमध्ये वैवाहिक वाद सुरु झाले. त्यानंतर पत्नीने चामलपूर येथील लक्ष्मी नारायण रुग्णालयात प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. नेहमीप्रमाणे 26 नोव्हेंबर रोजी डॉक्टर दाम्पत्यामध्ये घरगुती वाद झाला.

घरगुती वादातून मारहाण करत पत्नीची हत्या

वादादरम्यान अभिषेकने आपल्या वडिलांसह मिळून वंदनाला मारहाण सुरु केली. मारहाणीत जड वस्तूने वंदनाच्या डोक्यात प्रहार केला. यात वंदना गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.

हत्येनंतर 400 किमी दूर नेऊन मृतदेहावर अंत्यसंस्कार

यानंतर त्याने पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आणला. तेथे त्याने अॅम्बुलन्स बोलावली आणि मृतदेह 400 किमी दूर नेऊन तेथे अंत्यसंस्कार केले.

पोलिसात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली

दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी अभिषेकने स्थानिक पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. घरातील किमती सामानही गायब असल्याचे अभिषेकने पोलीस तक्रारीत सांगितले.

संशयावरुन पोलिसांनी चौकशी केली असता गुन्हा कबूल केला

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असता त्यांना दाम्पत्यामधील विवादाची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अभिषेकवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. संशयावरुन 12 डिसेंबर रोजी अभिषेकला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.

गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी अभिषेक आणि त्याच्या वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर