AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात घातला कुत्र्याचा पट्टा, रस्त्यावर फिरायला लावलं, हे कसलं वागणं भाऊ!

मोनोकिनी घातलेली स्त्री रस्त्यावर कुत्र्यासारखी गुडघ्यावर चालत आहे. तर, गाऊनमधील महिला तिच्या गळ्यात कुत्र्याचा लांब पट्टा घालून तिला ओढत आहे. कोणीतरी आपल्या पाळीव कुत्र्याला साखळीने बांधून रस्त्यावर फिरत आहे.

गळ्यात घातला कुत्र्याचा पट्टा, रस्त्यावर फिरायला लावलं, हे कसलं वागणं भाऊ!
DOG Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Feb 15, 2024 | 8:35 PM
Share

मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : सोशल मिडीयावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक किती खालच्या थराला जातात याचं एक उदाहरण समोर आलंय. सोशल मिडीयावर नाना प्रकारचे रील्स बनवून ते अपलोड केले जातात. त्यामधून जास्तीत जास्त लाईक, कमेंट मिळावे यासाठी काही वेळा बीभत्स, किळस आणणारे व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक किळसवाणा व्हिडीओ सोशल मध्यवर व्हायरल झालाय. मुंबई लगत असलेल्या मीरा भाईदर शहरातला हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून एका युजरने ‘ही घाण भारतात पोहोचली’ अशी कमेंट दिलीय.

मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा व्हिडीओ आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये दोन महिला दिसत आहेत. एका महिलेने मोनोकिनी ड्रेस घातला आहे. तर, दुसरीने डोक्यावर टोपी असलेला पूर्ण गाऊन घातला आहे.

रस्त्यावर विचित्र कृत्य करताना या महिला कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मोनोकिनी घातलेली स्त्री रस्त्यावर कुत्र्यासारखी गुडघ्यावर चालत आहे. तर, गाऊनमधील महिला तिच्या गळ्यात कुत्र्याचा लांब पट्टा घालून तिला ओढत आहे. कोणीतरी आपल्या पाळीव कुत्र्याला साखळीने बांधून रस्त्यावर फिरत आहे असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमधील दोन्ही महिला विदेशी आहेत. त्यांच्या या कृत्याचा एकाने व्हिडीओ बनविला आणि तो सोशल माध्यम X वर पोस्ट केलाय. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्याने या व्हिडीओला ‘This shit reach India’ अशी कॅप्शन दिलीय. हा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत असून लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत.

एका युजरने हा व्हिडिओ पाहून ‘आम्हाला जगातील नंबर वन देश बनायचे आहे. अव्वल देश होण्याचे अनेक फायदे आहेत आणि तोटेही कमी नाहीत. आम्ही अशी दृश्ये पाहू आणि त्यांना सामोरे जावे लागेल असे वाटले नव्हते. कारण, अमेरिकेत अशा घटना घडत असतात असे म्हटले आहे.

व्हिडिओखाली काही जणांनी अश्लील कमेंट केल्या आहेत. एका युजरने तर अशांना यूपी आणि बिहारमध्ये पाठवण्याची मागणी केलीय. मात्र, कुत्र्याच्या गळ्यात साखळी बांधून त्याला घेऊन जाने ठीक आहे. पण, मुलीच्या गळ्यात साखळी बांधून रस्त्यावर खुलेआम फिरणाऱ्यामागे त्यांचा हेतू काय आहे हे समजण्यापलीकडचे आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.