असे काय घडले की मित्रानेच मित्राला आयुष्यातून उठवले !

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 06, 2022 | 4:32 PM

सुधाकर इंगोले आणि राजीव लहाने हे दोघेही जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीला होते. अनेक वर्षापासून दोघे एकत्र काम करत असल्याने दोघांमध्ये खास मैत्री होती.

असे काय घडले की मित्रानेच मित्राला आयुष्यातून उठवले !
नोकरीच्या वादातून दिल्लीत तिहेरी हत्याकांड

गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा : जुन्या वादातून मित्राने मित्राची हत्या (Friend Murder Over Old Dispute) केल्याची घटना बुलढाण्यात उघडकीस आली आहे. सुधाकर इंगोले असे हत्या करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आरोपी मित्रासह तिघांना बुलढाणा शहर पोलिसांनी (Three Arrested by Buldhana City Police) बेड्या ठोकल्या आहेत. राजीव लहाने असे आरोपी मित्राचे नाव आहे. आरोपी आणि मयत दोघेही एकाच ठिकाणी नोकरी (Job) करत होते. तसेच एकमेकांचे खास मित्र होते.

एकत्र काम करत असल्याने दोघे मित्र बनले होते

सुधाकर इंगोले आणि राजीव लहाने हे दोघेही जिल्हा सामान्य रुग्णालयात नोकरीला होते. अनेक वर्षापासून दोघे एकत्र काम करत असल्याने दोघांमध्ये खास मैत्री होती. सुधाकर हे सध्या लोणार ग्रामीण रुग्णालयात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत होते.

जखमी अवस्थेत आढळले होते सुधाकर

दोघांमध्ये खास मैत्री असल्याने दोघे एकमेकांना काही ना काही कारणातून भेटायचे. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी धाड नाक्यावर सुधाकर इंगोले हे जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी बुलढाणा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

उपचारादरम्यान झाला मृत्यू

बुलढाण्यात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र औरंगाबाद येथे रुग्णालयात उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी मित्रासह तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी राजीव लहाने आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध कलम 307 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर इंगोले यांच्या मृत्यूनंतर आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेच्या संध्याकाळी सुधाकर यांना राजीव लहाने याने फोन करून बोलावल्याने ते घरून निघून गेले होते. राजीव लहानेसोबत त्यांचे एक-दोन वेळा भांडण झालेले होते. सुधाकर यांचे चुलत भाऊ गजानन रामदास इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी राजीव लहाने याच्यासह 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी राजीव लहाने याला अटक केली.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI