AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Terrorist Attack : उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; स्वातंत्र्य दिन सोहळ्यात घातपाताच्या तयारीत होते संशयित दहशतवादी

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) असदुद्दीन ओवेसीच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमचा सदस्य सबाउद्दीन आझमी याला लखनऊ मुख्यालयात चौकशी केल्यानंतर अटक केली.

Terrorist Attack : उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; स्वातंत्र्य दिन सोहळ्यात घातपाताच्या तयारीत होते संशयित दहशतवादी
काश्मिरात पुन्हा दहशतवादी कटाचा पर्दाफाश
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Aug 10, 2022 | 2:32 AM
Share

लखनऊ : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली व कश्मीरात हाय अ‍ॅलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. दहशतवादी संघटनांकडून देशातील स्वातंत्र्य दिन (Independence Day) सोहळ्याला टार्गेट करून दहशतवादी कारवाया घडवल्या जाऊ शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणेने याआधीच दिला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशात दहशतवादी हल्ल्या (Terrorist Attack)चा कट उधळून लावण्यात स्थानिक पोलिसांनी यश मिळवले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या संशयित दहशतवाद्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. हे दहशतवादी स्वातंत्र्य दिन सोहळ्यादरम्यान हल्ला करण्याचा कट आखत होते. याचदरम्यान त्यांना अटक करून उत्तर प्रदेश पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळून लावला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) असदुद्दीन ओवेसीच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमचा सदस्य सबाउद्दीन आझमी याला लखनऊ मुख्यालयात चौकशी केल्यानंतर अटक केली. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (एडीजी) प्रशांत कुमार यांनी मंगळवारी या कारवाईची माहिती दिली. आझमीने त्याच्या चौकशीदरम्यान दिलावर खान आणि बैराम खान अशी आणखी दोघं संशयित दहशतवाद्यांची नावे घेतली आहेत, असे त्यांनी सांगितले.

आझमीकडून बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली सामग्री जप्त

आझमी हा आझमगढ जिल्ह्यातील अमिलो भागातील रहिवासी आहे. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो इसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेमध्ये भरती करणाऱ्याच्या थेट संपर्कात होता, अशीही धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. एटीएसने आरोपी आझमीकडून बॉम्ब बनवण्यासाठी वापरलेली सामग्री, एक बेकायदा शस्त्र आणि काडतुसे जप्त केली आहेत.

इसिसमध्ये इतर तरुणांना सहभागी करण्यासाठी आझमीची सक्रियता

इसिसच्या विचारधारेने प्रभावित झालेला आझमी हा जिहादी तत्वांचा प्रसार करत आहे तसेच तो इतर तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी गोपनीय माहिती उत्तर प्रदेशच्या एटीएसला मिळाली होती. त्या गुप्त माहितीच्या आधारे चौकशीसाठी आझमीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याचे इसिसशी संबंध असल्याचे पुरावे सापडले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, असे पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. फेसबुकवर बिलाल नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर आझमीने काश्मीरमध्ये होणाऱ्या कारवाईबद्दल संभाषण सुरू केले. बिलालने इसिसचा दुसरा सदस्य मुसा उर्फ ​​खट्टाब काश्मिरी याच्याशी त्याचा संपर्क करून दिला. आझमीचा मुसा आणि त्यानंतर सीरियात राहणाऱ्या इसिसच्या अबू बकर अल-शमीशी संपर्क झाला, असेही पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. (A plot to attack a terrorist attack on Independence Day celebrations in Uttar Pradesh has been foiled)

Follow Us
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं