पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चोराची नामी शक्कल, पण पोलीस ते पोलीसच अखेर त्यांनी पकडलेच !

| Updated on: May 03, 2023 | 9:49 PM

गर्दीचा फायदा घेत नागरिकांचे मोबाईल हिसकावून पळ काढायचा. पोलिसांच्या हाती लागून नये म्हणून त्याने शक्कलही लढवली. पण अखेर पोलिसांनी हेरलेच.

पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चोराची नामी शक्कल, पण पोलीस ते पोलीसच अखेर त्यांनी पकडलेच !
डोंबिवलीत मोबाईल चोराला अटक
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : रेल्वेत गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यास मुंबई पोलिसांना यश आले आहे. रेल्वेची मालमत्ता चोरल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने तुरुंगातून सुटका होताच लोकलमध्ये मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला. आरोपीची सप्टेंबर 2022 मध्ये तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मोबाईल चोरी सुरु केली. तेव्हापासून तो पोलिसांना चकवा देत होता. पुन्हा पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून आपली ओळख लपवण्यासाठी त्याने टक्कल केले होते. पण कानून के हाथ लंबे होते है म्हणतात ना. त्याने कितीही शक्कल लढवली तरी पोलिसांनी त्याला हेरलेच. त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी झाली आहे.

आरोपीवर याआधीही चोरीचे गुन्हे दाखल

पवनकुमार निषाद असे या चोरट्याचे नाव असून, त्याच्या विरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत. एका चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून पवन सप्टेंबर महिन्यात जेलबाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा चोऱ्या करणे सुरू केले. पण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाच. आता पुन्हा त्याला जेलची हवा खावी लागणार आहे.

मोबाईल चोरीच्या तक्रारीनंतर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

ठाकुर्ली ते डोंबिवली रेल्वे प्रवासादरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या चोरट्याचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याची ओळख पटवली. आरोपी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचत त्याला अटक केली.

हे सुद्धा वाचा

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे साहेब, लोहमार्ग मुंबई, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, मध्य परिमंडळ, सहा पोलीस आयुक्त देविदास सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, पोलीस निरीक्षक किरण उंदरे, सहा पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हेड कॉ. पाटील, पो. कॉ. भांडारकर, पोलीस कॉ. वाघमोडे, पोलीस कॉ. पाटील, पोलीस कॉ. जाधव यांनी केली आहे.