AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Crime: ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं त्यानेच धोका दिला; बाईने असं काही केले की तिच्या जवळची सुटकेस उघडताच पोलिसही शॉक झाले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एकत्र राहत होते. महिलेने बॉयफ्रेंडकडे लग्नासाठी तगादा लावला होता. यावर दोघांमध्ये नेमही भांडण होत असायची. अशातच रविवारी रात्री पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात महिलेने प्रियकराचा वस्तऱ्याने गळा चिरळा. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने प्रियकराचा मृत्यू झाला.

Love Crime: ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं त्यानेच धोका दिला; बाईने असं काही केले की तिच्या जवळची सुटकेस उघडताच पोलिसही शॉक झाले
बंगुळुरुमध्ये पतीकडून पत्नीची हत्या
| Updated on: Aug 08, 2022 | 6:24 PM
Share

गाजियाबाद : ज्याच्यासाठी नवऱ्याला सोडलं त्यानेच धोका दिल्याने एका महिलेने टोकाचे पाऊल उचलले आहे. प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने ही महिला भयंकर चिडली. तिने रागाच्या भरात प्रियकराची हत्या(woman killed her boyfriend ) केली. यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट वाट लावण्यासाठी तिने प्रियकराचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. मात्र, मृतदेहाचा बंदोबस्त करण्याआधीच महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली. महिलेचे कृत्य पाहून पोलीसही शॉक झाले आहेत. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) हे भयानक हत्याकांड घडले आहे.

नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंडसह राहत होती

गाझियाबादच्या थाना तिला मोर येथील तुलसी निकेतन परिसरात हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे. आरोपी महिलेने आपल्या प्रियकराची वस्तऱ्याने हत्या केली आहे. आरोपी महिला ही विवाहीत आहे. मात्र, एका व्यक्तीसह तिचे विवाहबाह्य संबध होतो. नवऱ्याला सोडून ती चार वर्षापासून तिच्या प्रियकरासह राहत आहे.

लग्नावरून दोघांमध्ये भांडण झाले

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही एकत्र राहत होते. महिलेने बॉयफ्रेंडकडे लग्नासाठी तगादा लावला होता. यावर दोघांमध्ये नेमही भांडण होत असायची. अशातच रविवारी रात्री पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात महिलेने प्रियकराचा वस्तऱ्याने गळा चिरळा. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने प्रियकराचा मृत्यू झाला.

मृतदेहाची विलेव्हाट लावण्यासाठी खरेदी केली नवी सूटकेस

हत्येनंतर प्रियकराच्या मृतदेहाची विलेव्हाट लावण्यासाठी महिलेने नवी सूटकेस खरेदी केली . बाजारात जाऊन महिलेने जंबो साईजचे सुटकेस आणले. यानंतर प्रियकराचा मृतदेह या सुटकेसमध्ये भरला. सुटकेस घेऊन ती रेल्वे स्टेशनकडे निघाली.

सुटकेस स्टेशनवर सोडून जाण्याचा होता प्लान

बॉफ्रेंडचा मृतदेह सुटकेस मध्ये भरुन ही सुटकेस रेल्वे स्टेशनवर सोडून पलायन करण्याचा महिलेचा प्लान होता. यामुळेच मृतदेह सुटकेसमध्ये भरल्यानंतर ही महिला सुटकेस घेऊन रात्री उशीरा घराबाहेर पडली

चौकशी दरम्यान सुटकेसमध्ये मृतदेह सापडला

रात्री ही महिला घराबाहेर पडल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तिला अडवले. रात्रीच्या वेळेस एकटी महिला ऐवढी मोठी सुटकेस घेऊन कुठे निघालेय याचा पोलिसांना संशय आला. यामुळे सुटकेस उघडून पाहिली असता पोलिसांना धक्काच बसला. या सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचे पोलिसांना आढळले.

महिलेने पोलिसांना दिली बॉयफ्रेंडची हत्या केल्याची कबुली

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर महिलेने पोलिसांना दिली बॉयफ्रेंडची हत्या केल्याची कबुली दिली. महिलेचा मृत बॉयफ्रेंड हा दिल्लीतील एका सलूनमध्ये काम करायचा. तो सलुनमध्ये जो वस्तरा वापरायचा त्यात वस्तऱ्याने या महिलेने त्याची केल्याचे तिने पोलिसांना सांगीतले. ही महिला तिच्या मृत प्रियकरा सह लिव्ह रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.