सार्वजनिक शौचालयात महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

| Updated on: May 12, 2023 | 10:41 PM

तो महिलेचा शौचालयात व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होता. पण महिला सतर्क झाली अन् आरोपीच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. मग तरुणाची थेट तुरुंगात रवानगी झाली.

सार्वजनिक शौचालयात महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
Image Credit source: google
Follow us on

नवी मुंबई : सार्वजनिक शौचालयात महिलेचा चोरुन व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. सार्वजनिक शौचालयात महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर 24 वर्षीय तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस मकरंद असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. विनयभंग आणि लैंगिक छळ केल्याप्रकरणी कलम 354 आणि 354 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास प्रक्रिया सुरू असून यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल यांनी सांगितले.

आरोपी व्हिडिओ शूट करत असतानाच महिलेचे लक्ष गेले

बेलापूर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळील सार्वजनिक शौचालयात गुरूवारी रात्री ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वॉशरूममध्ये गेली आणि तिला शौचालयाच्या शेजारील भागातून मोबाईलचा प्रकाश येत असल्याचे दिसले. तिने तात्काळ बाहेर येऊन कारमध्ये बाहेर असलेल्या पतीला माहिती दिली.

महिलेच्या पतीने तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले

पतीने शौचालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्या व्यक्तीला बाहेर येण्यास सांगितले. यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना पकडल्यानंतर NRI पोलिसांनी 24 वर्षीय तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी बेलापूर येथील रहिवासी आहे.

हे सुद्धा वाचा