AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दाढी करायला तो घरी परतलाच नाही, पत्नीने फोन केला, मग फोनवर बोलता बोलता जे घडले ते भयंकर

हल्ली कशावरुन हत्या होईल याचा नेम नाही. अमरावीत हत्येची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येचे कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.

दाढी करायला तो घरी परतलाच नाही, पत्नीने फोन केला, मग फोनवर बोलता बोलता जे घडले ते भयंकर
अमरावतीत क्षुल्लक कारणातून तरुणाला संपवले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 06, 2023 | 2:03 PM
Share

अमरावती : अमरावतीत एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. दाढी करायला गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना बडनेरा येथे घडली आहे. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. तरुणाची थुंकी पायावर उडाली म्हणून त्याच्यावर हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी बडनेरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राहुल जनार्दन वसुकर असे मयत तरुणाचे नाव आहे, तर सिद्धांत उमेश डोंगरे असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली आहे.

थुंकी पायावर उडाल्याने वाद

मयत राहुल हा सोमवारी दुपारी दाढी करायला घरातून गेला. मात्र बराच वेळ होऊन गेला तरी तो घरी परतला नाही. म्हणून पत्नीने त्याला फोन केला. पत्नीसोबत फोनवर बोलतच तो मिलचाळ परिसरातून चालत घरी येत होता. यावेळी सिद्धांत डोंगरे हा देखील त्याच्या विरुद्ध दिशेने येत होता. यादरम्यान राहुल थुंकला असता त्याची थुंकी सिद्धांतच्या पायावर उडाली. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली. बघता बघता हा वाद विकोपाला गेला आणि आरोपीने लोखंडी पाईपने राहुलला मारहाण करण्यास सुरवात केली. यात राहुल गंभीर जखमी झाला.

आरोपी अटक

राहुलची पत्नी तेथे पोहचली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जखमी राहुलला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपीला अटक करत पुढील तपास सुरु केला आहे. हत्येमागे केवळ थुंकीचंच कारण आहे की आणखी काही जुना वाद आहे, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा