इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, मग एकमेकांना साताजन्माची वचने देत शरीरसंबंध ठेवून फसवणूक

पीडित तरुणीचे अभियांत्रिकी शिक्षण सुरू असताना इंस्टाग्रामवरून आरोपीशी मैत्री झाली. मग या मेत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोशल मीडियामध्ये दोघे एकमेकांशी दररोज चॅटिंग करायचे. आरोपी प्रियकराने तिचा विश्वास संपादन केला.

इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले, मग एकमेकांना साताजन्माची वचने देत शरीरसंबंध ठेवून फसवणूक
प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवले
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 21, 2022 | 12:08 AM

इंदूर : देशामध्ये महिलांवरील अत्याचाराचे सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. दिवसेंदिवस नवनव्या धक्कादायक घटना उजेडात येत आहेत. याचदरम्यान मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये एक इंजिनीअर तरुणी तिच्या प्रियकराच्या फसवणुकीला बळी पडली. विशेष म्हणजे या तरुणीचे प्रेमसंबंध इंस्टाग्रामच्या माध्यमातून जोडले गेले होते. इंस्टाग्रामवरून संपर्क साधल्यानंतर प्रियकराने महाराष्ट्रातून इंदूर गाठले होते. तेथे पोहोचल्यानंतर प्रेयसीवर बलात्कार करून त्याने पळ काढला. सुरुवातीला त्याने लग्नाचे वचन दिले होते. मात्र बलात्कार केल्यानंतर त्याने वचन मोडले आणि तो फरार झाला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी आरोपी प्रियकराला महाराष्ट्रातील अकोला येथून अटक केली आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना इंस्टाग्रामवरुन झाली होती ओळख

पीडित तरुणीचे अभियांत्रिकी शिक्षण सुरू असताना इंस्टाग्रामवरून आरोपीशी मैत्री झाली. मग या मेत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. सोशल मीडियामध्ये दोघे एकमेकांशी दररोज चॅटिंग करायचे. आरोपी प्रियकराने तिचा विश्वास संपादन केला. एकमेकांना प्रेमाचे वचन दिल्यानंतर आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले.

आरोपी शुभम देशमुख हा महाराष्ट्रातून इंदूरमध्ये आला होता. यावेळी त्याने एका हॉटेलमध्ये नेत तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित तरुणीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.

आरोपीची तुरुंगात रवानगी

पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधारे मध्य प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यात जाऊन आरोपी शुभम देशमुख याला अटक केली. त्याच्याविरोधात बलात्कार, फसवणूक आदी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.