AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भररस्त्यात गुंडांची दादागिरी, प्राणघातक हल्ला करत हवेत गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद

कारला अडवून तीन इसमांनी एकावर तलावरीने प्राणघातक हल्ला करत हवेत गोळीबार केला आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

भररस्त्यात गुंडांची दादागिरी, प्राणघातक हल्ला करत हवेत गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Dec 20, 2022 | 11:17 PM
Share

वसई : वसईमध्ये भररस्त्यात गुंडांच्या दादागिरीचा थरार पहायला मिळाला आहे. कारला अडवून तीन इसमांनी एकावर तलावरीने प्राणघातक हल्ला करत हवेत गोळीबार केला आहे. या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तलवारीने सपासप वार करून जखमी इसमाला बोलेरो पिकअप कारमध्ये टाकून आरोपी फरार झाले आहेत. याबाबत वालीव पोलिसांनी घटनास्थळावरून एक तलवार, एक बोलेरो गाडी जप्त करून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भर रस्त्यात घडलेल्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

आज सायंकाळी नाईकपाडा येथे घडली घटना

वसईच्या वालीव येथील नाईकपाडा येथे आज सायंकाळी सहा वाजता मनसे कार्यालयाच्या शेजारी ही घटना घडली. एम.एच.48 सी.बी. 0070 या बोलेरो गाडीतून डुक्कर घेवून वसईच्या दिशेने जात होती. तेवढ्यात समोरुन बोलेरो कंपनीच्या पिकअप गाडीने त्या बोलेरो गाडीला ठोकर मारत रस्त्यावरच अडवलं.

आरोपींनी तलवारीने वार करत हवेत गोळीबार केला

पिकअप गाडीतून तिघे बाहेर आले. त्यापैकी एकाने तलवारीने हरजित सिंग उर्फ दादू याच्यावर वार केले. त्याचबरोबर बोलेरो गाडीतील इतर चार जण फरार झाले. घटनास्थळी इतर नागरिक वाचवण्यासाठी येवू नये म्हणून, दुसऱ्या आरोपीने जवळची पिस्तुल बाहेर काढली.

गाडीवर फायरिंगचे तसेच तलवारीच्या वारचे निशाण आहेत. आरीपींनी जखमी दादूला आपल्या गाडीत बसवून घेवून गेले आहेत. काही अंतरावर ती गाडी सोडून, दुसऱ्या गाडीने आरोपींनी जखमी दादूला नेले.

पोलिसांकडून आरोपी आणि पीडितेचा शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, हरिजत सिंग उर्फ दादू आणि त्याच्या सहकाऱ्यांचा डुक्कर पाळणे आणि विक्री करण्याचा व्यवसाय आहे. आरोपी आणि जखमींमध्ये अंतर्गत वाद असल्याचं बोललं जात आहे. सध्या वालीव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आरोपी आणि जखमी दादूचा पोलीस शोध घेत आहेत. जखमीच्या गाडीत तीन ते चार डुक्करही आढळून आले आहेत.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती