Vasai Youth Drowned : घरी न सांगता पिकनिकसाठी आले होते तरुण, पाण्याचा अंदाज न आल्याने चिंचोटी धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू

| Updated on: Aug 02, 2022 | 8:25 PM

https://www.tv9marathi.com/maharashtra/pune/four-arrested-including-brother-and-sister-for-murdering-brother-in-hadapsar-au135-773610.html

Vasai Youth Drowned : घरी न सांगता पिकनिकसाठी आले होते तरुण, पाण्याचा अंदाज न आल्याने चिंचोटी धबधब्यात बुडून एकाचा मृत्यू
वसईतील चिंचोटी धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

वसई : वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिक (Picnic)साठी आलेल्या 19 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू (Death) झाला असल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस झाली आहे. अभिषेक मंडळ (19)असे पाण्यात बुडून (Drowned) मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत तरुण मुंबईतील सांताक्रुझ येथील रहिवासी आहे. याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. वसई, विरार, नालासोपारा येथील पर्यटन स्थळांवरती लोकांना जाण्यास मनाई आदेश लागू आहे. परंतु काही अति उत्साही पर्यटक जाऊन आपला जीव गमवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

घरी न सांगता चार तरुण पिकनिकला गेले होते

मुंबईतील सांताक्रुझ शांतीनगर येथील चार तरुण सोमवारी घरी न सांगता वसईच्या चिंचोटी धबधब्यावर पिकनिकसाठी आले होते. त्यापैकी एक तरुण पाण्यात उतरला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलीस आणि वसई-विरार महापालिकेच्या अग्निशामक विभागाच्या जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने तरुणाची शोध मोहीम सुरू केली होती. मात्र काल त्यांना मृतदेह हाती लागला नाही. कालपासून अथक प्रयत्न केल्यानंतर आज दुपारी 12:30 वाजता तरुणाचा मृतदेह मिळाला आहे.

बदलापूरमध्ये बॅरेज धरणात दोन तरुण बुडाले

हे सुद्धा वाचा

बॅरेज धरणावर पोहण्यासाठी आलेल्या दोन तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी बदलापूरमध्ये घडली. देवेंद्र यादव (24) आणि रोहन वानखेडे (34) अशी मयत तरुणांची नावे आहेत. उल्हासनगरमधील माणेरे गावातील आठ तरुण बॅरेज धरणावर पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने देवेंद्र आणि रोहन हे दोघे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरु केली. मात्र अंधारामुळे तरुणांचा शोध घेण्यास अडथळे येत होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासून शोधमोहिम सुरु करण्यात आली. त्यानंतर सोमवारी सायंकाळी मृतदेह हाती लागले. (A young man who had come for a picnic at Vasais Chinchoti Falls drowned)