AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : घर नावावर करण्याचा तगादा लावणाऱ्या सख्ख्या भावाचाच काटा काढला; कॅनॉलमध्ये ढकलून खून करणाऱ्या चौघांना अटक

दिघे यांचे एरंडवणा येथे एका चाळीत घर आहे. सुहास दिघे आणि त्यांची बहिण अश्विनी अडसूळ यांचा भाऊ पंकज दिघेने त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. त्यावरून त्यांनी प्रशांत आणि महेश धनपावडे यांनी सोबत घेऊन कट रचला.

Pune crime : घर नावावर करण्याचा तगादा लावणाऱ्या सख्ख्या भावाचाच काटा काढला; कॅनॉलमध्ये ढकलून खून करणाऱ्या चौघांना अटक
दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नातवाने आजोबांना संपवलेImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 02, 2022 | 7:36 PM
Share

पुणे : सख्ख्या भावाला कॅनॉलमध्ये ढकलून त्याचा खून (Murder) केल्याची घटना पुण्यात घडली आहे. डेक्कन परिसरातील घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी त्रास देतो, या कारणावरून भाऊ-बहिणीने दोघांच्या मदतीने भावाचा खून केला आहे. पंकज दिघे (वय 23, रा. डेक्कन जिमखाना) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) सुहास दिघे, अश्विनी अडसूळ, प्रशांत आणि महेश बाबुराव धनपावडे (वय 37, रा. देशमुखवाडी, शिवणे) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी (Fursungi) गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टच्या उसाच्या शेताजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये 18 मार्च 2017ला एक मृतदेह आढळला होता. त्यावेळी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

कॅनॉलच्या पाण्यात ढकलले

डेक्कन पोलीस ठाण्यात पंकज दिघे बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत पोलीस तपास सुरू होता. त्याचवेळी साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत घराच्या वादातून पंकज याला कॅनॉलच्या पाण्यात ढकलून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती मिळाली.

गाडीत घालून पळवले

दिघे यांचे एरंडवणा येथे एका चाळीत घर आहे. सुहास दिघे आणि त्यांची बहिण अश्विनी अडसूळ यांचा भाऊ पंकज दिघेने त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. त्यावरून त्यांनी प्रशांत आणि महेश धनपावडे यांनी सोबत घेऊन कट रचला. 14 मार्च 2017रोजी सायंकाळी पंकज याला तवेरा गाडीत घालून पळवून नेले.

मृतदेहाची पटली नव्हती ओळख

गाडीत मारहाण केली. त्यानंतर हडपसर येथे असलेल्या कॅनॉलमध्ये ढकलून दिले. पाच दिवसांनी सुहास दिघे याने डेक्कन पोलीस ठाण्यात भाऊ पंकज दिघे हा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तर त्याच्या आधीच हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथे एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्यानंतर तपास करत आधी महेश धनपावडे आणि नंतर इतर आरोपींच्या चौकशीतून खून केल्याचे स्पष्ट झाले.

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल