AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime : दारूच्या नशेत का राहतो, अशी विचारणा केली म्हणून सख्ख्या मावस भावाची निर्घृण हत्या; मद्यपीला बारामतीत अटक

वारंवार नशेत राहण्याबद्दल विचारणा केल्याने आपण त्याला मारणार, असे संतोष सतत म्हणत होता, अशी माहिती गजानन याच्या पत्नीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता संतोष याने सख्ख्या मावसभावाचा केवळ राग म्हणून खून केला.

Pune crime : दारूच्या नशेत का राहतो, अशी विचारणा केली म्हणून सख्ख्या मावस भावाची निर्घृण हत्या; मद्यपीला बारामतीत अटक
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपील बारामती पोलिसांनी घेतलं ताब्यात Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 02, 2022 | 4:01 PM
Share

बारामती, पुणे : सख्ख्या मावसभावाने भावावर कात्रीने तब्बल 38 वार करून हत्या (Brutal murder) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आज दुपारी साडेबारा वाजता रुई शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस राहणाऱ्या गजानन पवार या 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गजानन याचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्याचा पिता त्याला दिसला. तो घाबरला. त्याच अवस्थेत लहान मुलाने शेजारच्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांना (Baramati Police) याची माहिती देण्यात आली. तत्काळ पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गजानन पोलिसांना दिसला. गजानन हा मूळचा हिंगोलीचा असून तो बारामतीत एका केशकर्तनालयाच्या दुकानात (Barber shop) काम करत होता. अत्यंत निर्दयी पद्धतीने कात्रीचे वार करून हा खून करण्यात आला.

पोलिसांना आला संशय

गजाननबरोबरच त्याचा मावसभाऊ संतोष गुळमूळे हादेखील काम करतो. मात्र संतोष हा सतत दारूच्या नशेत असतो, ही माहिती पोलिसांना मिळाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो येथून जाताना दिसल्यानंतर पोलिसांना संशय आला. तोपर्यंत बारामती तालुका पोलिसांच्या याच कल्पनेनुसार संतोष गुळमुळे हा खरोखरच पळून जाण्याच्या तयारीत कटफळ रेल्वे स्थानकावर रेल्वेची वाट पाहत असल्याचे निदर्शनास आले. इतक्यात पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे.

निर्घृण पद्धतीने खून

वारंवार नशेत राहण्याबद्दल विचारणा केल्याने आपण त्याला मारणार, असे संतोष सतत म्हणत होता, अशी माहिती गजानन याच्या पत्नीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी अधिक तपास केला असता संतोष याने सख्ख्या मावसभावाचा केवळ राग म्हणून खून केला. एवढेच नाही, तर अतिशय निर्घृण पद्धतीने त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला आहे. आरोपी संतोष आणि मृत गजानन या दोघांचे आधी कधी भांडण झाले होते का, त्यांच्यात इतर काही वाद होते, का या सर्वांच्या दृष्टीन पुढील कारवाई आणि तपास तालुका पोलीस करीत आहेत.

शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.