AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनिमूनच्या दिवशी पत्नीला एक कॉल आला, मग संसार सुरु होण्याआधीच संपला; काय घडले नेमके?

तरुणाचा थाटामाटात विवाह पार पडला. यानंतर सुहागरातच्या दिवशी त्याच्या नववधूच्या मोबाईलवर एक कॉल आला. या कॉलनंतर तरुण बाहेर पडून गेला तो परतलाच नाही.

हनिमूनच्या दिवशी पत्नीला एक कॉल आला, मग संसार सुरु होण्याआधीच संपला; काय घडले नेमके?
लग्नानंतर दोन दिवसातच नवरदेवाचा मृत्यूImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 15, 2023 | 3:30 PM
Share

कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाची हनिमूनची रात्र शेवटची ठरली. हनिमूनच्या दिवशीच घरापासून 20 किमी अंतरावर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तरुणाच्या हत्येनंतर नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला. सुहागरातच्या दिवशी वधूच्या मोबाईल वर एक कॉल आणि मॅसेज आला. यानंतर तरुण घराबाहेर गेला. मग काही तासांनी त्याचा मृतदेह 20 किमी अंतरावर रेल्वेलाईनवर आढळला. याप्रकरणी अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, 9 महिने उटलटे तरी पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. मुलाच्या खुनाच्या आरोपीला पकडण्यासाठी तरुणाची आई पोलीस ठाण्यात चक्रा मारत आहे.

घरुन गेल्यानंतर काही तासात अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळला

कानपूरमधील घाटमपूर येथील तरुण सर्वेश याचा 17 मे 2022 रोजी विवाह झाला होता. यानंतर 19 मे रोजी हनिमूनच्या दिवशी सर्वेशच्या पत्नीच्या मोबाईलवर एक कॉल आला. यानंतर सर्वेश घरातून गेला. काही तासांनी सर्वेशचा मृतदेह 20 किमी अंतरावर रेल्वे लाईनवर अर्धनग्न अवस्थेत आढळला. या घटनेमुळे कानपूरमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला, मात्र अद्याप कुणालाही अटक नाही

नातेवाईकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र 9 महिने उलटले तरी पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही. ज्या क्रमांकावरून वधूला फोन आला होता, त्या क्रमांकावर फोन केला, पण तो रिसिव्ह केला नाही. या हत्याकांडात वधूचाही सहभाग असल्याचा सर्वेश कुटुंबीयांचा आरोप आहे. मात्र पोलिसांनी अद्याप वधूची चौकशी केली नाही, ना त्या फोन नंबरवरुन आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला.

Follow Us