वाहन चालक निघाला लाचखोर, महसूल विभागात खळबळ, लाच कुणाच्या सांगण्यावरून?

नाशिकच्या महसूल विभागातील एका वाहनचालकाने रात्रीच्या वेळी दीड लाखांची लाच घेत असतांना त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

वाहन चालक निघाला लाचखोर, महसूल विभागात खळबळ, लाच कुणाच्या सांगण्यावरून?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 06, 2023 | 3:00 PM

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये लाचखोरीच्या ( Nashik Bribe ) कारवाया वाढल्या आहेत. अशातच महसूल विभागातील एका वाहनचालकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक ( Nashik ACB ) विभागाच्या पथकाने लाच घेतांना रंगेहात अटक केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील इगपुरी तालुक्यातील शिरसाठे गावातील एकाची शेतजमिनी वादाच्या प्रकरणात दीड लाखांची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यानुसार शासकीय वाहनचालक अनिल बाबूराव आगिवले यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात बडे अधिकारी यांची नावे एसीबीच्या तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने केल्या जाणाऱ्या कारवाईमध्ये वाढ झाली आहे. दोन ते तीन दिवसांत एसीबीच्या पथकाकडून शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेतांना सापळ्यात अडकत आहे. अशातच एका शासकीय वाहन चालकाला लाच घेतांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

जमिनीच्या वादात दोन लाखांची लाच मागण्यात आली होती. त्यामध्ये दीड लाखांची लाचेची घेतांना अटक करण्यात आली होती. ही शनिवारी रात्री करण्यात आल्याने यामागील कोणते अधिकारी आहे अशी चर्चा आता महसूल विभागात सुरू झाली आहे.

खरंतर अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने पन्नास हजार रुपयांची लाच घेतल्याची कबूली दिली आहे. याशिवाय तक्रारदाराच्या बाजून निकाल लावून देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी यांच्याकडे याबाबत सुनावणी सुरू होती.

दरम्यान याच प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सुरू होते त्यांचीही मागील आठवड्यात बदली झाली आहे. त्यामुळे हे पैसे कुणाच्या सांगण्यावरून घेण्यात आले आहे. यामागील कोणत्या अधिकाऱ्याचे कनेक्शन आहे. याबाबत महसूल विभागात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.