AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘माझ्याकडे तुझ्या पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ, 10 लाख दे नाहीतर..’, कोल्हापुरात एका व्यक्तीला आरोपीची धमकी

कोल्हापूरमधून एक संतापजनक घटना समोर आली. पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून एका नराधमाने पीडित महिलेच्या पतीकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

'माझ्याकडे तुझ्या पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ, 10 लाख दे नाहीतर..', कोल्हापुरात एका व्यक्तीला आरोपीची धमकी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 9:00 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूरमधून एक संतापजनक घटना समोर आली. पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून एका नराधमाने पीडित महिलेच्या पतीकडून 10 लाखांची खंडणी मागितल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पण आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

नेमकं प्रकरण काय?

आरोपीने 23 ऑगस्ट रोजी पीडित महिलेच्या पतीला रस्त्यात गाठलं. त्याने पीडितेच्या पतीला पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाखांची खंडणी मागितली. “तुझ्या पत्नीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर 10 लाख रुपये दे. नाहीतर सर्व फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन”, असं आरोपी फिर्यादींना म्हणाला. आरोपीचे हे बोल ऐकून फिर्यादींच्या पायाखालची जमीनच सरकरली. आपली बदनामी होईल, या विचाराने ते त्रस्त झाले.

आरोपीच्या छळाला कंटाळून पीडितांची पोलिसात तक्रार

दुसरीकडे आरोपीची हिंमत दिवसेंदिवस वाढत होती. तो सारखा फिर्यांदिंना धमकी देवून त्रास देत होता. तर फिर्यादी कुटुंब हे बदनामी होईल, या भीतीने सर्व छळ सोसत होतं. अखेर आरोपीचा त्रास डोईजड झाल्यांनतर फिर्यांदींनी मनातील सर्व शक्ती एकवटून पोलीस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात आरोपीची तक्रार केली.

आरोपीचा शोध सुरु

पोलिसांनी फिर्यादींना भेदरलेल्या अवस्थेत बघून योग्य समुपदेशन केलं. त्यानंतर पोलिसांनी फिर्यांदींकडून सर्व माहिती जाणून घेतली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विरोधात खंडणी आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

पुण्यात तरुणीची आई आणि तिच्या प्रियकराकडून खंडणीची मागणी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुण्यात अशीच काहिशी घटना समोर आली होती. आपल्या आईवर प्रेम करतो म्हणून अद्दल घडवण्यासाठी एका तरुणीने तिच्या आईच्या प्रियकराकडे अश्लील फोटो शेअर करण्याची धमकी देत खंडणीची मागणी केली होती. 21 वर्षीय तरुणीला आपल्या आईच्या प्रेम प्रकरणाविषयी माहिती मिळाली. आईसोबत प्रेमसंबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला धडा शिकविण्यासाठी तिने आपल्या आईचं व्हाट्सअ‍ॅप अकाउंट हॅक केलं. त्यातून तिला तिच्या आईचे आणि प्रियकराचे अश्लील फोटो मिळाले.

तरुणीने या विषयाची माहिती तिच्या प्रियकराला दिली. त्यानंतर दोघांनी मिळून आई आणि तिच्या प्रियकराला लुबाडण्याचा कट आखला. 15 लाख रुपये रोख रक्कम द्या नाहीतर तुमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करतो, अशी धमकीच त्यांनी दिली. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने खंडणी मागणाऱ्या तरुणीच्या प्रियकराच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर तरुणीचा सर्व कट उघड झाला होता.

हेही वाचा :

‘मम्मीसोबत प्रेमसंबंध ठेवतोस?’, आईच्या प्रियकराला अद्दल घडवण्यासाठी तरुणीचा चुकीचा मार्ग, लाखोंची खंडणी

सहा वर्षांची मुलगी गायब, शेजारच्या तरुणाच्या घरातील कोपऱ्यात माती कशी? शहानिशासाठी खोदलं, चिमुकलीचा मृतदेह हाती, प्रचंड गदारोळ

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...