Punjab Encounter : पंजाबमध्ये पोलिस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, चार शार्पशूटर्सचा खात्मा; मूसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा समावेश

गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडात सहभागी असलेला गुंडही ठार झाला आहे.

Punjab Encounter : पंजाबमध्ये पोलिस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, चार शार्पशूटर्सचा खात्मा; मूसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा समावेश
पंजाबमध्ये पोलिस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 6:02 PM

अमृतसर : पंजाबमध्ये आज पोलिस आणि गुंडांमध्ये तुफान चकमक (Encounter) उडाली. त्यात चार शार्पशूटर्स (Sharpshooters) ठार झाले आहेत. यात गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील दोन आरोपींचा समावेश आहे. मनप्रित सिंग उर्फ मन्नू कुसा आणि जगरु सिंग ऊर्फ रुपा अशी मूसेवाला हत्याकांडातील मयत आरोपींची नावे आहेत. तसेच चकमकीत गोळी लागून एका पत्रकारा (Journalist)ला गंभीर दुखापत झाली असून अनेक पोलीसही जखमी झाले आहेत. अमृतसरमधील चिचा भकना गावात पोलिस आणि गॅगस्टर्समध्ये ही चकमक झाली आहे. या घटनेने संपूर्ण पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. चिचा भकना गावात सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाशी संबंधित गुंड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिस त्या गुंडांचा शोध घेण्यासाठी गावात आले होते. त्याचदरम्यान पंजाब पोलिसांवर गुंडांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिस आणि गुंडांमध्ये चकमक उडाली. त्यात पत्रकारही जखमी झाल्याचे पंजाब पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.

परिसरात पोलिसांची घेराबंदी

कुख्यात गुंड गावात लपून बसल्याची खबर पोलिसांना गावकरी लोकांनी दिली होती. त्याआधारे पोलिसांनी गावाला घेराव घालून कारवाई सुरू केली होती. याचदरम्यान गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देत पोलिसांनीही गोळ्या झाडल्या. या चकमकीने संबंधित गावासह आसपासच्या परिसरात प्रचंड खळबळ उडाली. गोळीबार करणारे गुंड कुठे लपले आहेत, याचा थांगपत्ता लावण्यासाठी पोलिसांनी भ गावाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. हे गाव पाकिस्तान सीमेजवळील अटारीजवळ आहे. गुंडांनी एके-47 च्या साहाय्याने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.

अँटी गँगस्टर टास्क फोर्सची कारवाई

चिचा भकना गावात पंजाब पोलिसांच्या अँटी गँगस्टर टास्क फोर्सची कारवाई अजूनही सुरू आहे. पोलिसांकडून संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. 29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात पंजाबी गायक सिद्धू मूसवालाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच हत्याकांडातील मारेकरी चकमकीत मारला गेला आहे. या चकमकीमुळे गुंडांचे धाबे दणाणले आहेत.

हे सुद्धा वाचा

आतापर्यंत सुमारे 100 राउंड फायर; गोळीबाराच्या आवाजाने परिसर हादरला

गोळीबाराच्या आवाजाने चिचा भकना गावासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. पोलिस आणि गुंड अशा दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 100 राउंड फायर करण्यात आले आहेत. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर झाले आहेत. पोलिसांनी गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. डझनभर वाहनांच्या ताफ्यासह पोलीस फौज चकमकीच्या ठिकाणी दाखल झाली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि चिलखती वाहनेही तैनात आहेत. (Accused in Musewala murder case killed in encounter, four start encounter in Attari)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.