Thalapathy Vijay Wife : थलपती विजय यांची पत्नी कोण ? संपत्तीच्या बाबतीत तर तिने… आकडा ऐकून येईल झीट
Vijay Thalapathy Wife Networth: थलपती विजय हे आता केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार राहिलेला नाहीत, तर ते तामिळनाडूच्या राजकारणाचेही नायक बनले आहेत. त्यांच्या राजकीय आयुष्याप्रमाणेच वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची लोकांना खूप उत्सुकता आहे.

थलपती विजय यांनी तामिळनाडूमध्ये धुमाकूळ घातला आहे. आता फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात त्यांची चर्चा होत आहे. पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच निवडणुकीत, अवघ्या 2 वर्षांत त्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे विजय यांच्या राजकीय प्रवसाप्रमाणेच लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांची पत्नी कोण, ती काय करते, तिची संपत्ती किती असेही अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. चला, जाणून घेऊया सविस्तर..(All Photos : Social Media)

थलपती विजय यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःचे एक अनोखे स्थान निर्माण केलं. त्यांचे चाहते त्यांच्या साधेपणाने आणि प्रतिभेने इतके मोहित झाले की, ते त्यांचे चित्रपट पाहिल्याशिवाय राहू शकत नाहीत. अभिनेता म्हणून त्यांनी कधीच आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही. आणि राजकारणात उतरवल्यावरही त्यांनी मोठं यश मिळवत चाहत्यांना निराश केलं नाही.

मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच काही बोललं जातं. पोर्ट्सनुसार, त्याची पत्नी संगीता सोरनलिंगम हिने तामिळनाडूतील चेंगलपट्टू कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. 26 वर्षांचा त्यांचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे. 25 ऑगस्ट 1999 साली विजय संगीताचं लग्न झालं, त्यांना जेसन संजय आणि दिव्या साशा अशी दोन मुलंही आहेत. थलपती विजय यांची पत्नी संगीत ही लाईमलाइटपासून नेहमीच दूर राहिली. पण त्यांची संपत्ती जाणून तुम्हीही अवाक् व्हाल.

थलपती विजय यांची पत्नी असलेली पत्नी संगीता सोरनलिंगमचा जन्म 22 जून 1974 झाला. यूकेमध्ये ती लहानाची मोठी झाली. तिच्या कुंटुंबाची मुळे श्रीलंकेच्या तमिळ समुदायाशी निगडीत आहेत. तिचे वडील एक प्रसिद्ध तमिळ उद्योगपती होते जे नंतर यूकेमध्ये स्थायिक झाले.

विजयशी लग्न झाल्यानंतरही संगीताने कधीही स्टारडमचा भाग बनण्याचा प्रयत्न केला नाही. ती नेहमी मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिली. रिपोर्ट्सनुसार, संगीता यांची एकूण संपत्ती 400 कोटींच्या आसपास आहे.

चित्रपटाच्या सेटवर विजय आणि संगीता यांची भेट झाली होती. असं म्हटलं जातं की फिल्म सिटीमध्ये शूटिंग दरम्यान त्या दोघांची भेट झाली. तिच्या साधेपणाने आणि चांगल्या मनाने विजय प्रभावित झाला, त्याने तिला घरी बोलावलं आणि तिच्या कुटुंबाशी तिची ओळख करून दिली. हळूहळू दोन्ही कुटुंबे जवळ आली आणि नात्याबद्दलच्या चर्चा वाढल्या. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने त्याच दोघांचं 25 ऑगस्ट 1999 साली लग्न झालं.