AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जींचा पराभव कुणाच्या जिव्हारी? सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमागे हे दोन देश? यंत्रणाही चक्रावल्या

Suvendu Adhikari’s PA Chandranath Murder: ममता बॅनर्जी यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाच्या हत्येने बंगाल हादरले आहे. या हत्येमागे या दोन देशांचे कनेक्शन असल्याचा आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

ममता बॅनर्जींचा पराभव कुणाच्या जिव्हारी? सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमागे हे दोन देश? यंत्रणाही चक्रावल्या
हत्येमागे भारताचे दुश्मन?Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 07, 2026 | 8:43 AM
Share

Suvendu Adhikari’s PA Chandranath Murder: भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ यांची काल निर्घृण हत्या करण्यात आली. ओव्हरटेक करत त्यांची कार थांबवण्यात आली आणि धडाधड गोळ्या झाडण्यात आल्या. या खूनप्रकरणाचे धागेदोरे आता थेट पाकिस्तान आणि बांगलादेशाकडे अंगुली निर्देश करत आहेत. ममता बॅनर्जी यांचा पराभव नेमका कुणाच्या जिव्हारी लागला? याची चर्चा होत आहे. स्वीय सहाय्यक चंद्रनाथ यांच्या हत्येमागील मास्टरमाईंडला पाकिस्तानसह बांगलादेशातून मदत मिळाल्याचा दावा करण्यात येत आहे. तर या हत्येमागे टीएमसी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर निवेदन प्रसिद्ध करत तृणमूल काँग्रेसने या हत्येचा निषेध केला आहे.

ऑस्ट्रियाचे ग्लॉक पिस्टलचा वापर

सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रनाथ यांची हत्या ही ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्टल G43x चा वापर करण्यात आला. या सेमी ऑटोमॅटिक पिस्टलमधून चंद्रनाथ यांच्यावर जवळपास एक डझन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांचे घर हे अवघे 200 मीटर दूर होते. चंद्रनाथ यांच्यावर धडाधड गोळ्या झाडण्यात आल्या. चंद्रनाथ यांचे डोके, छाती आणि पोटात गोळ्या झाडण्यात आल्या. अत्याधिक रक्त वाहून गेल्याने चंद्रनाथ हे जागीच बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात पोहचवण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. सुरक्षा यंत्रणांना घटना स्थळी काडतूस मिळाले. त्या काडतुसाआधारे हे ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्टल G43x असल्याचे समोर आले आहे. या पिस्टलवरूनच या हत्येचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे समोर येत आहे.

पाकिस्तान कनेक्शनचे काय धागेदोरे?

सुरक्षा यंत्रणांनुसार, ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्टल G43x ची विक्री भारतात अजिबात होत नाही. या पिस्टलची किंमतही लाखांच्या घरात आहे. भुरटे गुंड आणि स्थानिक गुन्हेगार हे लाखोंचे पिस्टल खरेदी करणे अवघड आहे. हत्येची सुपारी देणाऱ्यांनी शूटरला हे पिस्टल बांगलादेशातून उपलब्ध करून दिल्याची शंका उपस्थित होत आहे. हे पिस्टल काही दिवसांपासून पाकिस्तानातून तस्करीच्या माध्यमातून भारतात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती यंत्रणांनी दिली.

पाकिस्तानशी असे समोर आले कनेक्शन

सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी असे पिस्टल पाकिस्तानातून तस्करी होत असल्याचे म्हटले आहे. दीड महिन्यापूर्वी 26 मार्च रोजी सुरक्षा यंत्रणांनी भारत-पाकिस्तान सीमेवर असे 10 पिस्टल जप्त केले. या पिस्टलमध्ये तुर्की या देशाची जिगाना (Zigana), अमेरिकेतली बेरेटा पिस्टल, नोरिन्कोसह ऑस्ट्रियातील ऑस्ट्रिया निर्मित ग्लॉक पिस्टल G43x हस्तगत करण्यात आली होती. त्यामुळे हे पिस्टल थेट पाकिस्तानातून बांगलादेशात आणि तिथून ते पश्चिम बंगालमध्ये आल्याचा दावा करण्यात येत आहे.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...