AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वाधिक जागा जिंकूनही विजय थलपती सरकार स्थापन करू शकणार नाही? तामिळनाडूतील आजवरची सर्वात मोठी राजकीय घडामोड

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकल्या. मात्र, बहुमतासाठी 10 जागा कमी पडत असल्याने सरकार स्थापनेचा दावा फेटाळला गेला. आता विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी DMK आणि AIADMK युती करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास, सर्वाधिक जागा जिंकूनही विजयला सरकार स्थापन करता येणार नाही, हे तामिळनाडूच्या राजकारणातील मोठे नाटकीय वळण ठरेल.

सर्वाधिक जागा जिंकूनही विजय थलपती सरकार स्थापन करू शकणार नाही? तामिळनाडूतील आजवरची सर्वात मोठी राजकीय घडामोड
तामिळनाडूत घडामोडींना वेगImage Credit source: social media
| Updated on: May 07, 2026 | 8:58 AM
Share

तामिळनाडूमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या विजय यांना सरकार स्थापन करण्याची संधी आहे. पण टीव्हीकेला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीएमके पक्ष युती करू शकतात. असे झाल्यास, थलपथी विजय यांना तामिळनाडूमध्ये 108 जागा जिंकूनही सरकार स्थापन करता येणार नाही.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा उलटफेर झालेला पहायला मिळाला. अवघ्या 2 वर्षांपूर्वी पक्ष स्थापन झालेल्या विजय यांच्या टीव्हीकेने डीएमके आणि एआयडीएमके या प्रस्थापितांना मोठा धक्का दिला. या निवडणुकीत विजय यांच्या पक्षाला सर्वाधिक, 108 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांच पक्षा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. थलपती विजय यांच्या टीव्हीकेने, काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे धाव घेतली. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांची संख् अद्यापया त्यांच्याकडे नसल्याने राज्यपालांनी त्यांचा सत्तास्थापनेचा दावा फेटाळला. मात्र याचदरम्यान, तामिळनाडूच्या राजकारणातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी, डीएमके आणि एआयएडीएमके, एकत्र येऊ शकतात, या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

विजय यांच्या पक्षाला तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी डीएमके आणि एआयएडीएमकेने कंबर कली असून हे दोन्ही पक्ष युती करू शकतात अशी चर्चा सुरू आहे. मात्र असं प्रत्यक्षात झाल्यास, सर्वाधिक 108 जागा जिंकूनही थलपथी विजय यांना तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करता येणार नाही. त्याऐवजी, एकमेकांशी वैर असलेले दोन पक्ष सरकार स्थापन करू शकतात.

एआयएडीएमकेच्या सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, डीएमकेसोबत युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र डीएमकेने अद्याप या युतीबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.

विजय यांच्या पक्षाने जिंकल्या सर्वाधिक जागा

थलपथी विजय यांचा अभिनेते ते नता असा प्रवास सर्वांनी पाहिला. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या त्यांच्या टीव्हीके पक्षाने यावर्षी तामिळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल 108 जागा जिंकल्या. मात्र असं असलं तरी बहुमतासाठी त्यांना अजूनही 10 जागा कमी पडत आहेत. तामिळनाडूमध्ये बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता असून, सध्या केवळ पाच काँग्रेस आमदारांनी विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकूण जागांची संख्या 113 झाली आहे, पण बहुमतासाठी अजूनही 5 जागा कमी पडत आहेत.

समोर आहेत 3 शक्यता

तर त्यांना रोखण्यासाठी एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात युती होण्याची चर्चा सुरू आहे. जर ही युती झाली, तर तीन शक्यता निर्माण होऊ शकतात. पहिली शक्यता म्हणजे , द्रमुक आणि एआयएडीएमके युती करतील, पण हे असंभव दिसतंय. हे अवघड असण्याचं कारण म्हणजे द्रमुककडे काँग्रेस आहे आणि एआयएडीएमकेकडे भाजप आहे.

पुढली शक्यता म्हणजे , जर काँग्रेस आणि द्रमुक आघाडीतून बाहेर पडले, तर एआयएडीएमके आणि पीएमके एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकतील. मग त्यांच्याकडे बहुमताच्या आकड्यापेक्षा एक जागा जास्त, म्हणजेच 119 जागा असतील.

जर द्रमुक आणि एआयएडीएमके यांनी युती केली, तर तामिळनाडूच्या राजकारणात ही एक अभूतपूर्व घटना ठरेल. 1967 पासून तामिळनाडूमध्ये, सत्ता या दोन पक्षांपैकी एकाच्या हातात (आलटून पालटून) होती. हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. 1967 मध्ये द्रमुक सत्तेवर आल्यापासून, कोणताही राष्ट्रीय पक्ष तामिळनाडूमध्ये आपले स्थान निर्माण करू शकलेला नाही. त्या काळात करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील स्पर्धेची पातळी खूपच वेगळी होती. करुणानिधी द्रमुक पक्षाचे, तर जयललिता एआयएडीएमके पक्षाच्या होत्या. विधानसभेत ते दोघे कधीही एकमेकांशी हसत-बोलत नसतं, त्यांचे संबंध नेहमी कटूच राहिले. एखाद्या मंचावर, व्यासपीठावर एकत्र असताना किंवा राज्याच्या तसेच राष्ट्रीय कार्यक्रमांना उपस्थित राहतानाही, द्रमुक आणि एआयएडीएमके यांनी नेहमीच अंतर राखलं.

डीएमके आणि एआयएडीएमके नेते एकमेकांना केवळ नापसंतच करत नाहीत, तर त्यांच्यात द्वेष होता. याच द्वेषामुळे मार्च 1989 साली करुणानिधींच्या उपस्थितीत विधानसभेत जयललितांची साडी ओढण्यात आली होती. एवढंच नव्हे तर , करुणानिधी यांनीनी जयललिता यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले होतं. मात्र नंतर जेव्हा जयललिता सत्तेवर आल्या, तेव्हा त्यांनी ऐन मध्यरात्री करुणानिधींना त्यांच्या घरातून अटक करवली होती. त्यामुळेच हे लक्षात घेण्यासारखं आहे की एवढी जुनी दुश्मनी बाजूला ठेवू हे दोन्ही पक्ष जर युती करण्यास तयार होत असतील, तर त्यांच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या थलपथी विजय यांना सरकार स्थापन करण्यापासून, सत्तेत येण्यापासून रोखणं, हाच त्यांचा उद्देश आहे.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!