AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ बनला चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा; लवकरच ‘वेड’चा विक्रम मोडणार

Raja Shivaji Box Office: रितेश देशमुखचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. हा आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. लवकरच तो 'वेड' आणि 'बाईपण भारी देवा' यांनाही मागे टाकणार असल्याचं दिसतंय.

Raja Shivaji : 'राजा शिवाजी' बनला चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी सिनेमा; लवकरच 'वेड'चा विक्रम मोडणार
सलमान खान, रितेश देशमुख (राजा शिवाजी)Image Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2026 | 8:55 AM
Share

Raja Shivaji : रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची इतकी चर्चा होती की पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई झाली. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा हा चित्रपट ठरला. ओपनिंग वीकेंडलाही जबरदस्त कमाई झाली. परंतु संमिश्र प्रकारच्या रिव्ह्यूमुळे आता वीकेंडनंतर कमाईत घट झाल्याचं पहायला मिळतंय. तरीसुद्धा ‘राजा शिवाजी’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली, असं म्हणायला हरकत नाही. विक्रमी ओपनिंग वीकेंडनंतर, या चित्रपटाने सोमवारची परीक्षाही यशस्वीरित्या पार केली. मंगळवारीही चांगली कमाई झाली, ज्यामुळे कमाईचा आकडा 50 कोटी रुपयांजवळ पोहोचला. आता हा चित्रपट ‘वेड’च्या लाइफटाइम कलेक्शनला टक्कर देण्याच्या मार्गावर आहे.

‘राजा शिवाजी’ने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या बुधवारी 4.25 कोटी रुपये कमावले आहेत. तर पहिल्या दिवशी 11.35 कोटी रुपयांची कमाई झाली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 12 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 5.60 कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी 4.90 कोटी रुपये कमावले. भारतात सहा दिवसांत या चित्रपटाची एकूण कमाई 48.65 कोटी रुपये इतकी झाली आहे. ‘राजा शिवाजी’ हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे.

48.65 कोटी रुपयांच्या कमाईसह ‘राजा शिवाजी’ हा सध्या भारतातील आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. तिसरं स्थान मिळवण्यासाठी त्याला ‘वेड’ या चित्रपटाला मागे टाकावं लागेल, ज्याची लाइफटाइम कमाई 61.2 कोटी रुपये इतकी आहे. यासाठी ‘राजा शिवाजी’ला आणखी 13 कोटी रुपये अधिक कमावण्याची गरज आहे. येत्या काळात कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे तो ‘बाईपण भारी देवा’लाही (76.28) मागे टाकू शकतो.

भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट

  1. सैराट- 90 कोटी रुपये
  2. बाईपण भारी देवा- 76.28 कोटी रुपये
  3. वेड- 61.2 कोटी रुपये
  4. राजा शिवाजी- 47.6 कोटी रुपये
  5. नटसम्राट- 42 कोटी रुपये
  6. पावनखिंड- 37.72 कोटी रुपये
  7. लय भारी- 37 कोटी रुपये
  8. कट्यार काळजात घुसली- 35 कोटी रुपये
  9. ठाकरे- 31.6 कोटी रुपये
  10. टाइमपास- 30 कोटी रुपये

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुखनेच केलं आहे. यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, बोमन इराणी, फरदीन खान यांच्याही भूमिका आहेत. तर सलमान खानने यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...