AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यावरून उचललं, अनाथ म्हणून जीवापाड जपलं, 13 वर्षांनी तिनेच… आईच्या खुनाचा हादरवणारा कट!

एका महिलेने रस्त्यावर रडत असलेल्या तीन दिवसांच्या मुलीला दत्तक घेतले होते. ती १३ वर्षांची झाल्यावर तिने जे काही केलं ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

रस्त्यावरून उचललं, अनाथ म्हणून जीवापाड जपलं, 13 वर्षांनी तिनेच... आईच्या खुनाचा हादरवणारा कट!
Crime Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 18, 2025 | 4:59 PM
Share

ओडिशामध्ये एका महिलेने 13 वर्षांपूर्वी एका नवजात मुलीला दत्तक घेतले होते. ती मुलगी तिला रस्त्याच्या कडेला रडताना सापडली होती. तेव्हा ती मुलगी अवघी तीन दिवसांची होती. महिलेने त्या मुलीला केवळ दत्तकच घेतले नाही, तर तिचे आयुष्य घडवण्यासाठी ती रात्रंदिवस मेहनत करत होती. तिला मोठ्या लाडाने वाढवत होती. पण तीच मुलगी आपल्या मृत्यूचे कारण बनेल, याचा त्या महिलेने कधीच विचार केला नसेल.

जेव्हा ती मुलगी 13 वर्षांची झाली, तेव्हा तिने आपल्या दोन पुरुष मित्रांसह मिळून आईचा खून केला. समोर आलेल्या माहितीनुसार, 13 वर्षांपूर्वी राजलक्ष्मी आणि त्यांचे पती घरी जात असताना रस्त्याच्या कडेला त्यांना एक नवजात मुलगी रडताना सापडली. तिचे रडणे पाहून त्या दांपत्याचे मन हेलावले आणि त्यांनी तिला दत्तक घेतले. ती मुलगी कोणाची आहे, याचा काहीच पत्ता लागला नाही. म्हणून दांपत्याने तिचे संगोपन सुरू केले. पण जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा तिने दोन पुरुषांच्या मदतीने आपली दत्तक आई राजलक्ष्मीची क्रूरपणे हत्या केली. वाचा: हॉटेलमध्ये भेटायला गेला… पत्नीच निघाली गर्लफ्रेंड; पतीचे सत्य आले समोर

पोलिसांच्या माहितीनुसार, आठवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या दोन पुरुष मित्रांसह मिळून 29 एप्रिल रोजी गजपति जिल्ह्यातील परलाखेमुंडी शहरात भाड्याच्या घरात आपली 54 वर्षीय आई राजलक्ष्मीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राजलक्ष्मी आपल्या मुलीच्या दोन तरुणांशी असलेल्या संबंधांना विरोध करत होती. त्यामुळे संतापलेल्या मुलीने आईचा खून केला.

झोपेच्या गोळ्या देऊन केले बेशुद्ध

आरोपी मुलीने आधी रात्री फसवून राजलक्ष्मी यांना झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या. मग बेशुद्ध अवस्थेत त्यांचा उशीने गळा दाबला. त्यानंतर ती आपल्या आईला रुग्णालयात घेऊन गेली, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी, भुवनेश्वरमध्ये त्यांच्या नातेवाइकांच्या उपस्थितीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना सांगण्यात आले की, त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. कोणालाही काहीच कळले नाही.

अशा प्रकारे उघड झाले हत्येचे गूढ

दोन आठवड्यांनंतर, राजलक्ष्मी यांचे भाऊ सिबा प्रसाद मिश्रा यांना त्या मुलीचा मोबाइल फोन भुवनेश्वरमध्ये सापडला, जो तिथे राहिला होता. जेव्हा त्याची तपासणी केली गेली, तेव्हा इन्स्टाग्रामवरील त्या मुलीच्या तरुणांशी झालेल्या संभाषणात हत्येचा खुलासा झाला आणि संपूर्ण खुनाचा कट समोर आला. इन्स्टाग्रामच्या चॅटमध्ये त्या मुलीने तरुणांशी राजलक्ष्मी यांच्या हत्येची आणि त्यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हडपण्याची चर्चा केली होती. हे कळताच मिश्रा यांनी 14 मे रोजी परलाखेमुंडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर हत्येत सहभागी असलेल्या तिघा आरोपींना, किशोरी मुलीला, मंदिराचे पुजारी गणेश रथ (21) आणि त्याचा मित्र दिनेश साहू (20) यांना अटक करण्यात आली. हे दोघेही त्या शहरातील रहिवासी आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.