AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापजनक! बदलापूरनंतर अंबरनाथमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी नराधमाच्या नांग्या ठेचल्या

बदलापूरच्या संतापजनक घटनेमुळे वातावरण तापलेलं असताना देखील काही नराधमांना कोणताही धाक राहिलेला बघायला मिळत नाहीय. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी बदलापूरचे नागरीक आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यांनी दिवसभर रेल्वे सेवा ठप्प केली. तरीदेखील अशा घटना अद्यापही सर्रासपणे होताना बघायला मिळत आहेत. आरोपींना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

संतापजनक! बदलापूरनंतर अंबरनाथमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोलिसांनी नराधमाच्या नांग्या ठेचल्या
बदलापूरनंतर अंबरनाथमध्ये 9 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Aug 22, 2024 | 4:04 PM
Share

बदलापूरच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. देशभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय. राज्यातील राजकीय वातावरण देखील या घटेनेमुळे तापलं आहे. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या घटनेचे पडसाद अनेक ठिकाणी बघायला मिळाले आहेत. पण या घटनेनंतरही राज्यातील महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. बदलापूरपासून अगदी काही किलोमीटर अंतर असलेल्या शेजारच्या अंबरनाथ शहरातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एका 35 वर्षीय इसमाने अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेत, तिला अश्लील चित्रफित दाखवत विनयभंग केला. या घटनेमुळे अंबरनाथ शहरातही खळबळ उडाली आहे.

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरण ताजं असतानाच आता अंबरनाथमध्येही एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 35 वर्षीय नराधमाने एका 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला शौचालयात नेत तिचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपीला पोलीस कोठडी

अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने 21 ऑगस्टलाअंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

Follow Us
बंधारा फुटला अन् नदीला पूर! नदीकाठच्या गावांना तातडीचा सतर्कतेचा इशारा
Karjat Rain Update | बंधारा फुटला अन् नदीला पूर! नदीकाठच्या गावांना तातडीचा सतर्कतेचा इशारा
ठाकरे गटाचं ठरलं! दुसरा टप्पा नागपूर... उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
Uddhav Thackeray | ठाकरे गटाचं ठरलं! दुसरा टप्पा नागपूर... उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय
नाशिकचा गंगापूर रोड खचला; सिटीलिंक बससह वाहने अडकली, नेमकं काय घडलं?
Nashik Rain News | नाशिकचा गंगापूर रोड खचला; सिटीलिंक बससह अनेक वाहने अडकली, नेमकं काय घडलं?
सगळीकडे पाणीच पाणी! पुण्यात हाहाकार... मुसळधार पावसामुळे 27 हजार 100
सगळीकडे पाणीच पाणी! पुण्यात हाहाकार... मुसळधार पावसामुळे 27 हजार 100 क्युसेकने विसर्ग सूरु
एकाला वाचवायला गेले..पण चौघांचाही जीव गेला! एकाच कुटुंबावर काळाचा घाला
मोठी बातमी! एकाला वाचवायला गेले... पण चौघांचाही जीव गेला! साताऱ्यात एकाच कुटुंबावर काळाचा घाला
मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत?
Mumbai | मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत? तपास सुरू
भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune Rain | भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ