AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinayak Mete No More : विनायक मेटेंच्या पत्नीची तब्येत बिघडली, उपचार सुरु

विनायक मेटे यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात आपला वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांचा मोबाईल हा कधीच बंद नसत. शिवाय कार्यकर्त्यांसाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला होता. शिवाय त्यांचा फोन हा कधीच बंद लागत नव्हता, अपघाताची बातमी समजल्यानंतर जेव्हा आपण फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा तो बंद लागल्याचे त्यांच्या पत्नी यांनीच सांगितले होते.

Vinayak Mete No More : विनायक मेटेंच्या पत्नीची तब्येत बिघडली, उपचार सुरु
विनायक मेटेImage Credit source: tv9 marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Aug 14, 2022 | 3:31 PM
Share

मुंबई : शिवसंग्रामचे नेते तथा माजी आमदार (Vinayak Mete) विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे (Accident) अपघातामध्ये निधन झाले आहे. त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर इजा झाल्याने ही दुर्वेवी घटना घडली आहे. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मेटे हे बीडहून मुंबईला निघाले होते. दरम्यान, एका (Unknown Vehicle) अज्ञात वाहनाच्या धडकेत ही दुर्घटना घडली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने असंख्य कार्यकर्ते तर सावरू शकलेले नाहीत पण त्यांच्या पत्नींचीही तब्येत बिघडली आहे. त्यांना आता सलाईन लावण्यात आले आहे. पतीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेटे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले आहे.

अपघातानंतर फोन बंद

विनायक मेटे यांना कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी राजकारणात आपला वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांचा मोबाईल हा कधीच बंद नसत. शिवाय कार्यकर्त्यांसाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला होता. शिवाय त्यांचा फोन हा कधीच बंद लागत नव्हता, अपघाताची बातमी समजल्यानंतर जेव्हा आपण फोन करायचा प्रयत्न केला तेव्हा तो बंद लागल्याचे त्यांच्या पत्नी यांनीच सांगितले होते. हे सांगत असताना त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

मेटेंच्या पत्नीला सलाईन

विनायक मेटेंच्या अपघाती निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. शनिवारी रात्री ते बीडच्या घरातून मुंबईकडे मार्गस्थ झाले होते. रात्री 11.30 वाजता ते गेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. मात्र, त्यानंतर 6 ते 7 तासामध्येच त्यांच्या अपघाताची बातमी कुटुंबियांना समजली. हे सर्व धक्कादायक होते. याचा परिणाम त्यांच्या पत्नीवर झाला असून त्यांची तब्येत ही बिघडली आहे. आता त्यांना देखील सलाईन लावण्यात आले आहे.

राज्याच्या राजकारणात शोककळा

विनायक मेटे हे कोणत्या पक्षात होते हे महत्वाचे नाही तर त्यांचे संबंध महत्वाचे राहिलेले आहेत. शिवाय सत्ता कोणाचीही असो मराठा आरक्षणासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आहे. त्यांच्या निधनाने राजकीय गोठात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपचार सुरु असलेले रुग्णालय जवळ केले. शिवाय कुटुंबियांना दिलासाही दिला. त्यांच्या अचानक जाण्याने बीडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Follow Us
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल