राज्यात चालले तरी काय? संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आणखी एका युवकाची क्रूरपणे हत्या, हात-पाय अन् मुंडके छाटले
Mauli Gavhane: माऊली याचा ७ मार्चला बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी त्याच्या दाणेवाडी येथील घरुन शिरूर येथे गेला होता. पेपर दिल्यानंतर परत तो घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत त्याचा मृतदेह सापडला होता.

Crime News: राज्यात गुन्हेगारांना कायद्याची काहीच भीती उरली नाही. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या झाल्याच्या प्रकारानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आता पुन्हा एका १९ वर्षीय कॉलेज तरुणाचा निर्घृण खून झाला आहे. त्या युवकाचे दोन्ही हात, पाय अन् मुंडके छाटले आहे. त्यानंतर धड एका पोत्यात तर पाय, हात, डोके एका पोत्यात भरुन दोन्ही गाठोडे विहिरीत फेकून दिल्याचा खळबळजनक प्रकार श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये घडला आहे. माऊली सतीश गव्हाणे असे त्या युवकाचे नाव आहे.
हत्येमागे काय आहे कारण?
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्याचे सीमेवर असणाऱ्या दाणेवाडी गावामध्ये माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या तरुणाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. निर्घृण खुनामागील नेमके कारण अजून समोर आले नाही. माऊली सतीश गव्हाणे हा बारावीचा विद्यार्थी आहे. त्याचा खून करताना आरोपींनी त्याचे दोन्ही हात पाय अन् मुंडके छाटले. मयताचे शीर, हात, पाय हे झाडे कट करण्याच्या स्वयंचलित कटरने कपल्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात तर पाय, हात आणि डोके एका पोत्यात भरले. हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते. पोलिसांना हे मृतदेह मिळाल्यानंतर माऊलीच्या नातेवाईकांना बोलवण्या आले. त्यांनी तो माऊलच असल्याचे सांगितले.
तपास गुन्हे शाखेकडे
क्रूर हत्येच्या या घटनेने शिरूर, श्रीगोंदा, अहिल्यानगर, पुणे जिल्हा व महाराष्ट्र हादरला आहे. अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला आहे. खून करणारे आरोपींनी कोणताही पुरावा मागे न ठेवला नाही. यामुळे पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग व पोलीस पथक या गुन्ह्याचा तपास कसा करेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारावीचा पेपर देल्यानंतर माऊल बेपत्ता
माऊली याचा ७ मार्चला बारावीचा पेपर होता. तो पेपर देण्यासाठी त्याच्या दाणेवाडी येथील घरुन शिरूर येथे गेला होता. पेपर दिल्यानंतर परत तो घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला होता. त्यानंतर गावाजवळ असणाऱ्या एका विहिरीत त्याचा मृतदेह सापडला होता.