प्रेयसी म्हणाली, म्हातारी माझ्यावर ओरडली, प्रियकराकडून घरात घुसून गेम, नगरमधील थरार

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आठ दिवसापूर्वी भरदिवसा एका वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती.

प्रेयसी म्हणाली, म्हातारी माझ्यावर ओरडली, प्रियकराकडून घरात घुसून गेम, नगरमधील थरार
अहमदनगरमधील हत्याकांडाचा उलगडा
Follow us
| Updated on: Jan 29, 2021 | 5:41 PM

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आठ दिवसापूर्वी भरदिवसा एका वृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत होते. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आपल्या प्रेयसीशी ही महिला भांडल्याच्या रागातून, तिची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी जालना येथून आरोपी आणि तिच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे. (Ahmednagar 60 years lady murder case solved by Sangmaner Police)

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर इथे आठ दिवसांपूर्वी 19 जानेवारीला 65 वर्षीय सावित्रीबाई शेळके नामक महिलेची भरदिवसा घरात घुसून हत्या करण्यात आली होती. मात्र या महिलेची हत्या कुणी आणि का केली असा प्रश्न होता. याप्रकरणी पोलीस हल्लेखोराचा शोध घेत होते.

प्रथमदर्शनी ही घटना सोने चोरीच्या उद्देशाने झाल्याचं दिसत होते. त्यावेळी एका चार वर्षीय मुलीच्या कानातील दागिनेही ओरबडण्याचा प्रयत्न झाल्याने ती जखमी झाली होती.

पोलिसांनी या घटनेचा कसून तपास केला. याप्रकरणात पोलिसांनी जी माहिती मिळाली ती अत्यंत धक्कादायक होती. मयत वृद्ध महिलेने आरोपीच्या प्रेयसीसोबत भांडण केल्याच्या रागातून भाऊसाहेब उर्फ भावड्या झुंबर येलमामे याने त्यांची हत्या केली.

प्रेयसीने आरोपीला म्हातारीचा बेत बघण्यास सांगितलं आणि आपल्या प्रेयसीच्या अपमानाचा बदला म्हणून थेट वृद्धेचा खून करून आरोपीने पोबारा केला होता. मात्र पोलिसांनी या घटनेचा छडा लावला असून, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातून आरोपी आणि त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.

(Ahmednagar 60 years lady murder case solved by Sangmaner Police)

संबंधित बातम्या 

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.