महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

महाराष्ट्र हादरला! 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार, अपमान झाला म्हणून पीडितेची आत्महत्या

लातुर : लातूरमध्ये महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 60 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अपमान सहन न झाल्याने पीडित महिलेने तलावात उडी घेत आत्महत्या केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (a 60 year old woman raped in latur victim commits suicide)

मिळालेल्या माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातल्या अहमदपूर येथील ही घटना आहे. किशन उगाडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीने पीडित महिलेला विश्वासात घेऊन वाकी नदीच्या जवळच्या शेतामध्ये नेलं आणि तिथे तिच्यावर अत्याचार केले.

या घटनेनंतर पीडित महिलेच्या सुनेनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. पण या सगळ्यात आपला अपमान झाल्या या भावनेनं पीडितेने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. पीडितेने तलावात उडी घेत आपलं आयुष्य संपवलं. खरंतर, वयाच्या 60 व्या वर्षी अशा वेदना सोसाव्या लागल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आरोपीची चौकशी करत असून नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. (a 60 year old woman raped in latur victim commits suicide)

संबंधित बातम्या – 

पुण्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकाच्या हत्येची सुपारी, राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो, या खात्यावरून FB ला फ्रेंड रिक्वेस्ट आली तर सावधान, होईल मोठा मनस्ताप

बेपत्ता पत्नी साडेतीन वर्षांनी प्रियकरासोबत सापडली, शिर्डी पोलिसांचा धक्कादायक खुलासा

(a 60 year old woman raped in latur victim commits suicide)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI