पत्नीचा राहत्या घरी गळफास, पतीचीही ऑफिसमध्ये आत्महत्या, लग्नानंतर चार महिन्यात टोकाचं पाऊल

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Ahmednagar Wife Suicide Husband Hangs himself)

पत्नीचा राहत्या घरी गळफास, पतीचीही ऑफिसमध्ये आत्महत्या, लग्नानंतर चार महिन्यात टोकाचं पाऊल
Ahmednagar Wife Husband Suicide

अहमदनगर : पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीनेही आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरमध्ये समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणीने घरात आपली जीवनयात्रा संपवली, त्यानंतर कार्यालयात पतीने गळफास घेत आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात नवदाम्पत्याची अखेर झाली. दोघांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. (Ahmednagar Crime News Jamkhed Wife Commits Suicide at Home Husband Hangs himself in Office)

चार महिन्यांपूर्वी थाटामाटात विवाह

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 28 वर्षीय शिल्पा आणि 32 वर्षीय अजय कचरदास जाधव यांचा चारच महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. शहरातील बीड रोडवर आदित्य गार्डन शेजारी जाधव दाम्पत्य राहत होते.

पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीचाही गळफास

शिल्पा जाधव हिने बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी अजयला समजली. या घटनेमुळे अजयला मोठा धक्का बसला. काही तासातच त्यानेही मोरे वस्तीमधील पाण्याच्या प्लांटमधील ऑफिसमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

पतीची सुसाईड नोट सापडली

अजयने गळफास घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. माझ्या आत्महत्येला मी जबाबदार असून कोणासही दोषी ठरवू नये, असे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. (Ahmednagar Crime News Wife Suicide Husband Hangs himself)

दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी

अजयचा भाऊ अभिषेक कचरदास जाधव याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. अजय आणि शिल्पा यांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दोघांचे मृतदेह शव विच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या

(Ahmednagar Crime News Jamkhed Wife Commits Suicide at Home Husband Hangs himself in Office)