AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akola : अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळले, चार जण जखमी!

नंदापुरकडे जात असतांना पिंजर्डा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत पडल्याने दुर्घटना घडली आहे. यावेळी ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये चार मजुर बसले होते. ट्रॅक्टर थेट नदीत पडल्याने चारही मजुर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हे मजुर नेमके कुठे आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीयं.

Akola : अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात ट्रॅक्टर ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळले, चार जण जखमी!
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 03, 2022 | 3:14 PM
Share

अकोला : अकोला (Akola) जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यात मोठी दुर्घटना घडलीयं. ट्रॅक्टर (Tractor) ट्राॅलीसह पुलावरुन नदीत कोसळले आहे. यात चार जण जखमी झाल्याची माहिती मिळतंय. अकोला जिल्हातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे विटाखाली करुन पिंजर येथुन पातुर नंदापुरकडे जात असतांना कारंजा ते पिंजर रोडवरील पिंजर जवळील स्मशानभूमीला लागुनच असलेल्या पिंजर्डा नदीच्या पुलावरून चार मुजरांसह ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत कोसळले आहे. अपघात (Accident) नेमका कशामुळे झाला हे समजू शकले नाहीयं. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पिंजर्डा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत पडले

नंदापुरकडे जात असतांना पिंजर्डा नदीच्या पुलावरून ट्रॅक्टर ट्राॅलीसहीत नदीत पडल्याने दुर्घटना घडली आहे. यावेळी ट्रॅक्टरच्या ट्राॅलीमध्ये चार मजुर बसले होते. ट्रॅक्टर थेट नदीत पडल्याने चारही मजुर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. हे मजुर नेमके कुठले आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकली नाहीयं. अपघातानंतर ट्रॅक्टर नदीत पडलेले फोटो अनेकांनी काढून सोशल मीडियावर शेअर देखील केले आहेत.

चार मजुरांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू

या अपघाताची माहिती परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच अपघात झाल्यावर आजुबाजूच्या लोकांनी मजुरांना बाहेर काढून आरोग्य केंद्रात पाठवण्यास मदत देखील केली. पिंजर्डा नदीच्या पुलावरून या अगोदरही अनेक अपघात झाल्याचे कळते आहे. नदीच्या पुलाचे संरक्षण कठडे चांगले नसल्याने नेहमीच या पुलावर अपघात होतात. तसेच या ट्रॅक्टरच्या अपघाताने नदीचे संरक्षण कठडे देखील तुटल्याचे दिसते आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार