Alibag Family Suicide : बातमी वाचून काळीज करपेल, दोन चिमुकल्यांना विष देऊन आई-वडिलांनी घेतला गळफास, अलिबागच्या कॉटेजमध्ये काय घडलं?

11 मे पासून अलिबागमध्ये हे चौघे वास्तव्यास होते. काल रूममध्ये गेल्यानंतर सकाळ पासून दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेडवर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला.

Alibag Family Suicide : बातमी वाचून काळीज करपेल, दोन चिमुकल्यांना विष देऊन आई-वडिलांनी घेतला गळफास, अलिबागच्या कॉटेजमध्ये काय घडलं?
अलिबागमध्ये एकाच कॉटेजमध्ये चार मृत्यू, एक अख्खं कुटूंब संपलं, हत्या-आत्महत्येनं नवी मुंबई हादरलीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 9:11 PM

अलिबाग : फिरण्याच्या उद्देशातून आलेल्या महिला आणि पुरुषाने मुला मुलीला विष (Poison) देवून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना अलिबागमध्ये (Alibag) घडली आहे. शहरातील ब्लॅसम कॉटेजमध्ये ही घटना घडली असून हे सर्व जण कळंबोली येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 11 मे पासून अलिबागमध्ये हे चौघे वास्तव्यास होते. काल रूममध्ये गेल्यानंतर सकाळ पासून दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नसल्याने दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेडवर तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला. याप्रकरणी अलिबाग पोलिसांना कळवताच पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेने सध्या अलिबागसह महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे.

आत्यहत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

या महिला आणि पुरुषाने मुला मुलीला विष देवून हत्या केल्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या का केली? या भयानक प्रकरामागे नेमकं कारण काय आहे? याची मात्र अद्याप काही माहिती मिळू शकली नाही. पोलिसांकडून या कॉटेजच्या कर्मचाऱ्यांचे आणि मालकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. नवी मुंबईतील कळंबोलतील तपास केल्यावरच पोलिसांना या भयानक प्रकरणामागे नेमकं कारण काय हे समजण्याची शक्यता आहे. त्यामुळे अलिबाग पोलीस लवकच नवी मुंबईत दाखल होत या ठिकाणी तपास करून या छडा लावण्याची शक्यता आहे. यात पोलिसांच्या तपासात आता कोणतं कारण बाहेर येतंय. याबाबत लवकरच खुलासा होण्याची शक्यता आहे. सध्या तरी हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.

कौटुंबिक वादातून घडला प्रकार?

असे प्रकार अनेकदा कौटुंबिक वाद किंवा आर्थिक चिंतेतून घडत असतात. या प्रकरणातही या दोन्ही शक्यता असू शकतात. मात्र पोलिसांचा तपास पूर्ण होण्याआधी कुठल्याही अंदाजाने निष्कर्ष लावणे योग्य नाही कारण यामागे काही आणखी वेगळे कारणही असू शकते. या जोडप्याने हे पाऊल उचलताना लहान मुलांचाही विचार केला नाही. विष देऊन त्यांचाही  जीव घेतला आहे. त्यानंतर गळफास घेत आत्महत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने सध्या सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा छडा लावणे तसेच यामागील खऱ्या कारणापर्यंत पोहोचणे हे आता पोलिसांसमोरील मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाला आचा चांगलाच वेग आला आहे. यात ते नवी मुंबई पोलिसांची मदत घेण्याचीही शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.