अंबरनाथमध्ये चोरट्याचा धुमाकूळ, एकाच रात्रीत दोन दुकानात चोरी, पळवले हजारो रुपये

एका चोरट्याने धुमाकूळ माजवत एकाच रात्रीत दोन दुकानं लुटत हजारो रुपयांची रोकड पळवली. अंबरनाथ शहरातील वर्धमान नगर परिसरातील चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ड्रायफ्रुट्स आणि मेडिकला, अशा दोन्ही दुकानांमध्ये चोरट्याने डल्ला मारत रोकड पळवली.

अंबरनाथमध्ये चोरट्याचा धुमाकूळ, एकाच रात्रीत दोन दुकानात चोरी, पळवले हजारो रुपये
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 3:56 PM

अंबरनाथ | 17 नोव्हेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरांचा सुळसुळाट पसरला असून त्यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतच चालल्या असून सामान्य नागरिकांना मोठा नस्ताप सहन करावा लागत आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही चोरांना रोखण्यात अपयश मिळत आहे. त्यातच आता अंबरनाथ शहरामधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका चोरट्याने धुमाकूळ माजवत एकाच रात्रीत दोन दुकानं लुटत हजारो रुपयांची रोकड पळवली.

अंबरनाथ शहरातील वर्धमान नगर परिसरातील चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ड्रायफ्रुट्स आणि मेडिकला, अशा दोन्ही दुकानांमध्ये चोरट्याने डल्ला मारत रोकड पळवली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आता या चोरट्यांचा सीसीटीव्ही आधारे शोध घेत आहेत.

एका रात्रीत लुटली दोन दुकानं

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्व भागातील वर्धमान नगर परिसरात दीपक ठाकूर जयस्वाल यांच ऑल इन वन मेडिकल दुकान आहे. या दुकानात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शटरचा लॉक तोडून आत मध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुकानात असलेल्या टेबलचा ड्रॉव्हर त्याने ड्रायव्हरने उचकटून उघडला आणि त्यातले 50 हजार रुपये घेऊन पोबारा केला.

मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्या मेडिकलच्या बाजूलाच असलेल्या विघ्नहर डेरी अँड ड्रायफूट दुकानाकडे नजर वळवली. तो या दुकानातही घुसला आणि तेथील 15 हजार रोख रक्कम चोरी करून तो फरार झाला. त्याने दोन्ही दुकानातून चोरट्याने तब्बल 65 हजार रुपयाची रोख रक्कम चोरून नेली. चोरीची ही संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आता या चोरट्यांचा सीसीटीव्ही आधारे शोध घेत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे. मात्र चोरीच्या या घटनेमुळे खळबळ माजली असून या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी दुकान चालकाने केली आहे.

मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार
'... त्यांच्या तोंडाला फेस येईल', फडणवीसांच्या टीकेवर राऊतांचा पलटवार.