Amravati Umesh Kolhe murder case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला वेगळे वळण, आरोपी उमेशच्या अंत्यविधी कार्यक्रमातही सहभागी!

उमेश कोल्हे आणि आरोपी युसुफ खान यांचे चांगले संबंध असल्याचे पुढे आले आहे. धक्कादायक म्हणजे उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातही आरोपी युसुफ खान सहभागी झाला होता. सुरूवातीला पोलिसांनी या हत्येप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता एकून सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Amravati Umesh Kolhe murder case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला वेगळे वळण, आरोपी उमेशच्या अंत्यविधी कार्यक्रमातही सहभागी!
Image Credit source: tv9
सुरेंद्रकुमार आकोडे

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jul 03, 2022 | 1:43 PM

अमरावती : अमरावतीच्या उमेश कोल्हे (Umesh Kolhe) हत्याप्रकरणानंतर राज्यात मोठी खळबळ उडालीयं. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अनेक दावे केले जात आहेत. इतकेच नाही तर उमेश कोल्हे यांचे बंधु महेश यांनी अनेक आरोप (Allegations) केले. पोलिसांनी आतापर्यंत या हत्येतील एकून सात आरोपींना अटक केली असून हत्येचा मुख्य सुत्रधार देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. आता उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सात आरोपीतील एक आरोपी युसुफ खान (Yusuf Khan) आणि उमेश कोल्हे यांचे घरगुती संबंध असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीयं.

आरोपी आणि उमेश कोल्हे यांचे घरगुती संबंध

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे केल जात आहेत. आता या हत्येसंदर्भात नवीन वळण समोर आले, या प्रकरणात एकून सात आरोपींना अटक करण्यात आले. त्यापैकी एक युसुफ खान आणि उमेश कोल्हे यांचे चांगले संबंध असल्याचे कळते आहे. इतकेच नाही तर आरोपी युसुफ खान यांच्या घरगुती कार्यक्रमात मृतक उमेश कोल्हे अनेक वेळा सहभागी झाल्याचे कळते आहे.

उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधी कार्यक्रमातही आरोपी उपस्थित

उमेश कोल्हे आणि आरोपी युसुफ खान यांचे चांगले संबंध असल्याचे पुढे आले आहे. धक्कादायक म्हणजे उमेश कोल्हे यांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमातही आरोपी युसुफ खान सहभागी झाला होता. सुरूवातीला पोलिसांनी या हत्येप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता एकून सात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

हे सुद्धा वाचा

मेडिकलमधून घरी जात असताना उमेशवर जीवघेणा हल्ला

कोल्हे हत्याकांड प्रकरण फास्टटॅग कोर्टात चालवण्याची मागणी उमेश कोल्हे यांचे बंधु महेश कोल्हे यांनी केली आहे. NIA कडे तपास वर्ग केल्याने लवकरच न्याय मिळेल कुटुंबातील सदस्यांना अपेक्षा आहे. कोल्हे यांचं स्वत:चं मेडिकल स्टोर आहे. 21 जून 2022 ला कोल्हे रात्री उशीरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठलं आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें