Pune crime : गोळीबार करत, दुकानाच्या काचा फोडत सशस्त्र दरोडा; खेड-शिवापूर पोलिसांकडून सहा आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना

दरोडेखोरांनी सोने लुटून तिथून पळ तर काढलाच मात्र दरोडा टाकला त्याशेजारी असलेल्या सलून दुकानावरसुद्धा हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना समजताच राजगड पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेऊन पंचनामा केला.

Pune crime : गोळीबार करत, दुकानाच्या काचा फोडत सशस्त्र दरोडा; खेड-शिवापूर पोलिसांकडून सहा आरोपींच्या शोधासाठी पथकं रवाना
दरोड्यानंतर ज्वेलरी शॉपीची पाहणी करताना पोलीस
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 9:57 AM

पुणे : सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरच्या, श्री गणेश ज्वेलर्सवर चार जणांनी सशस्त्र दरोडा (Robbery) टाकल्याची घटना घडली आहे. ज्वेलर्ससह शेजारच्या सलून दुकानात गोळीबार (Firing) करत सोने लुटून तिथून चोरट्यांनी पोबारा केला. खेड-शिवापूर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या शोधार्थ ठिकठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरोड्यात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांच्या शोधासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. दरोड्याची ही घटना रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली. पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर (Khed Shivapur) या गावातील शिवापूर वाडा येथील श्री गणेश ज्वेलर्स या दुकानावर हा दरोडा तीन जणांनी टाकला. आता पोलिसांनी ठिकठिकाणी पथकांमार्फत या सहाजणांचा शोध सुरू केला आहे.

हत्याराने फोडल्या दुकानाच्या काचा

दरोडेखोरांनी सोने लुटून तिथून पळ तर काढलाच मात्र दरोडा टाकला त्याशेजारी असलेल्या सलून दुकानावरसुद्धा हल्ला केला असल्याचे निदर्शनास आले आहे. ही घटना समजताच राजगड पोलिसांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेऊन पंचनामा केला. दुकानात घुसल्यानंतर पिस्तुल दाखवून ज्वेलर्समधील दोन जणांना बाजू हटीये, असे म्हणून दुकानातील सोन्याचा ऐवज घेतला. यावेळी शेजारी असलेल्या सलूनच्या दुकानात गोळीबार केला. त्यानंतर दुकानाच्या काचा हत्याराने फोडून दुचाकीवरून पलायन केले.

ठिकठिकाणी पथके रवाना

काही मिनिटांतच राजगड पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ तेथे आले असता, घडलेला प्रकार लक्षात येताच त्यांनी सूत्रे हलवून राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली असून एकूण आरोपी सहा जण असल्याचे सांगितले आहे. दरम्यान भोरचे पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांनी पाहणी केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.