कहरच ! प्रायव्हेट पार्ट खाण्याची आवड, फ्रिजमध्ये थेट… एवढं करुनही हा नरभक्षक आजही जिवंत
आर्मिन मेवाइज (ARMIN Meiwes) हा जर्मनीतील रोटेनबर्ग येथे राहणारा एक सामान्य कॉम्प्युटर टेक्निशियन आहे. 2001 साली मध्ये त्याने बर्न्ड नावाच्या माणसाला त्याच्या घरी बोलावलं आणि..

नरभक्षक.. नाव ऐकताच आपल्या अंगावर काटा येतो. माणसाला खाणाऱ्या माणसाबद्दल ऐकून कोणालाही भीतीच वाटेल ना. आज आपण अशाच एका सायको किलरबद्दल जाणून घेणार आहोत, जो माणसांना तर खातोच पण त्याहून भयानक त्याची आवड आहे. तो विचित्र प्रकार म्हणजे त्याला पुरूषांचा प्रायव्हेट पार्ट खाण्याची आवड होती. तो सायको किलर कोण, कुठला , अजूनही जिवंत आहे का ?
आज आम्ही जगातील सर्वात खतरनाक अशा सायको किलर्सबद्दल सांगतोय, तो म्हणजे जर्मनीचा आर्मिन मेवाइज (ARMIN Meiwes). या सायको किलरला पुरूषांचा प्रायव्हेट पार्ट खाण्याची आवड होती. एवढञंच नव्हे तर त्या आवडीपायू त्याने एका माणसासोबत जे केलं, ते तर एखादा हैवानही करू शकणार नाही.
कोण आहे आर्मिन मेवाइज (ARMIN Meiwes)?
आर्मिन मेवाइज (ARMIN Meiwes) हा जर्मनीतील रोटेनबर्ग येथे राहणारा एक सामान्य कॉम्प्युटर टेक्निशियन आहे. 2001 साली मध्ये त्याने बर्न्ड नावाच्या माणसाला त्याच्या घरी बोलावले. त्यानंतर त्याने या माणसाचा प्रायव्हेट पार्ट म्हणजेच त्याचं गुप्तांग कापलं. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणज मेवाईजने हे भयानक कृत्य त्याने केलं तेव्हा तो माणूस जिवंत होता आणि प्रचंड वेदनांनी विव्हळत होता. त्यानंतर मेवाईजने त्याचा प्रायव्हेट पार्ट खाल्ला. एवढंच नव्हे तर बर्न्ड जिवंत असतानाचा आर्मिनने त्याच्या पाठीवरून मांसाचा तुकडा कापला. मग त्याने त्याचा आवडता डिनर सेट बाहेर काढला, मेणबत्त्या पेटवल्या आणि टेबल सजवले. त्याने ते मांस तळले, जे त्याने ‘बटाटे’ आणि स्प्राउट्ससोबत वाढून खाल्लं.
एका मुलाखतीत आर्मिन म्हणाला होता की, ‘हे मांस डुकराच्या मांसासारखे चवीचे होते, पण ते खूपच चांगले होते.’ ते खाऊन झाल्यानंतर त्या भयानक माणसावे, आर्मिनने बर्न्डला बाथटबमध्ये झोपवले आणि शेवटी त्याच्या मानेवर वार केला, ज्यामुळे बर्न्डचा मृत्यू झाला.
10 महिने हळू हळू ..
बर्न्डच्या मृत्यूनंतर आर्मिनने त्याच्या शरीराचे तुकडे केले. त्यातील काही तुकडे त्याने बागेत पुरले आणि तर बाकीचं मासं फ्रीजरमध्ये ठेवलं. पुढील 10 महिने तो हे मांस हळूहळू खात राहिला. प्रत्येक वेळी तो हे मांस वेगवेगळ्या प्रकारे शिजवत असे, कधी सॉसमध्ये, कधी ग्रील्डमध्ये आणि कधी दुसऱ्या पद्धतीने शिजवायचा आणि खायचा. पण हे रहस्य जास्त काळ लपून राहू शकले नाही. या नरबक्षक राक्षसाने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला होता. काही दिवसांनी त्याने तो एका वेबसाइटवर अपलोड केला. या घटनेच्या काही महिन्यांनंतर, 2002 साली पोलिसांनी त्याला अटक केली.
एका इंटरव्ह्यूमध्ये तो म्हणाला होता की, त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला माणूस खाण्याबद्दल स्वप्न पडायचीय त्यानंतर च्याने हे सर्व सुरू केलं. त्याने अनेक लोकांना मारल्याचंही कबूल केलं. तो लोकांना मारायचा आणि त्यांचे मांस फ्रीजरमध्ये ठेवायचा. आणि ते अनेक महिने खात असे, असं त्याने कबूल केलं. तो स्वतःला मास्टर बुचर म्हणवायचा.
अजूनही जिवंत आहे नरभक्षक
यानंतरही आर्मिनने न्यायालयात आपली बाजू मांडली. ‘बर्न्ड स्वतःच्या इच्छेने आला होता’ असं तो म्हणाला होता. जानेवारी 2004 साली आर्मिनला मनुष्यवधाचा दोषी ठरवण्यात आलं आणि 8 वर्षं 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. पण 2006 मध्ये, पुन्हा खटला चालवण्यात आला आणि त्याला हत्येचा दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आज, वयाच्या 63 व्या वर्षी, आर्मिन तुरुंगात आयुष्य घालवत आहे.
