Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 2 NCB अधिकारी निलंबित, प्रकरण कोणतं वळण घेणार?

एनसीबी मुंबईच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे . त्यामध्ये एक केसमध्ये तपास अधिकारी अधीक्षक विश्वविजय सिंग आणि दुसरे इंटेलिजेस अधिकारी आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे.

Aryan Khan Drugs Case : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 2 NCB अधिकारी निलंबित, प्रकरण कोणतं वळण घेणार?
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे दोन अधिकारी निलंबितImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 13, 2022 | 9:42 PM

मुंबई : आर्यन खान क्रूज ड्रग (Aryan Khan Drugs Case) प्रकरण संपूर्ण देशभर गाडलं. आता याच प्रकरणात काही गोष्टी एनसीबीच्या (NCB) अंगलट आल्या आहेत. कारण एनसीबी मुंबईच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे . त्यामध्ये एक केसमध्ये तपास अधिकारी अधीक्षक विश्वविजय सिंग आणि दुसरे इंटेलिजेस अधिकारी आशिष रंजन प्रसाद या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. एनसीबी सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या दोन्ही अधिकाऱ्यांचे वर्तन संशयित आढळलं असल्याची प्राथमिक माहिती आहे , ज्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष टीमने दोघांचं निलंबन केलेलं आहे. मात्र नेमकं कारण काय आहे ज्यामुळे या दोघांना निलंबित करण्यात (NCB Officer Suspended) आलं आहे ते अजूनही समोर आलेलं नाही. विशेष बाब म्हणजे या प्रकरणात तपास अधिकारी आणि सुपरिंटेंडेंट विवी सिंग यांना निलंबनच्या काळात गुहाटी हेडक्वार्टर येथे रिपोर्ट करण्यासंदर्भात निर्देश दिले गेले आहेत . या दोन्ही अधिकाऱ्यांची भूमिका संशयित होती म्हणून त्यांना निलंबित केलं गेलं आहे.

प्रकरण काय आहे ?

2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूजवर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता आणि या छाप्याचे नेतृत्व एनसीबी मुंबईचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केलं होतं. सदर क्रूजवर ड्रग पार्टी सुरू आहे, असी माहिती तेव्हा एनसीबी अधिकाऱ्यांना मिळाली होती. मात्र कारवाई दरम्यान एनसीबी टीमने आर्यन खान , अरबाज मर्चेन्ट, मूनमून धामेचा या तिघांना सोबत एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. नंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. या संपूर्ण ऑपरेशन मध्ये एनसीबीचे जवळपास 22 अधिकारी हे प्रवासी बनून क्रूज वर गेले होते आणि त्यावेळी क्रूजवर जवळपास 1800 लोक होते. विशेष बाब ही आहे की या प्रकरणात समीर वानखेडेंवर अनेक आरोप करण्यात आल्यानंतर त्यांना या चौकशीतून बाजुला करण्यात आलं होतं.

देशभर गाजलेलं प्रकरण

या प्रकरणता बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाला बरेच दिवस जेलमध्ये काढावे लागले होते. यादरम्याने अनेक राजकीय आरोप प्रत्यारोपही झाले होते. आता ईडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यामुळे हे प्रकरण देशभर गाजलं होतं. आता या प्रकरणात मोठी अपडेट आल्याने खळबळ माजली आहे. हे प्रकरण आता एनसीबी अधिकाऱ्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. यात पुढे काय कारवाई होते, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

CCTV VIDEO: दिवसा रेकी आणि रात्री घरफोडी; दरवाजा तोडून साडे पाच लाखाचे दागिने लंपास

Ganesh Naik Live In Case: आमदार गणेश नाईकांची अडचण, महिलेचा लिव्ह इनचा आरोप, मुलगा असल्याचाही दावा, महिला आयोगाचे चौकशीचे आदेश

Pune crime : अट्टल मोबाइल चोरट्यांसह विकत घेणारेही जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.