AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : घटस्फोट मागितला म्हणून भयानक राग आला; भररस्त्यात पेट्रोल टाकून बायकोला पेटवून दिले

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी अशी ही  घटना आहे. रईस खान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागीतला होता. म्हणून तो नाराज होता. या रागातूनच त्याने भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. मात्र स्थानिकांची सतर्कता आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे महिलेचा जीवा वाचला आहे. 

Crime : घटस्फोट मागितला म्हणून भयानक राग आला; भररस्त्यात पेट्रोल टाकून बायकोला पेटवून दिले
| Updated on: Jul 09, 2022 | 3:43 PM
Share

दिल्ली : प्रत्येक जोडप्यात वाद होतात. हे वाद कधी कधी इतके विकोपाला जातात की प्रकरण घटस्फोटापर्यंत(divorce) पोहचते. अनेकदा समजुतीने पती पत्नी एकमेकांना घटस्फोट देतात आणि नातं संपवतात. मात्र, नात संपवण्याची भाषा करत घटस्फोट मागणाऱ्या महिलेला याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पत्नीने घटस्फोट मागीतला म्हणून एका माथेफिरु पतीने पेट्रोल(petrol) टाकून तिला जिवंत जाळण्या प्रयत्न केला. मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) ही भयंकर घटना घडली आहे.

पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी अशी ही  घटना आहे. रईस खान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या पत्नीने त्याच्याकडे घटस्फोट मागीतला होता. म्हणून तो नाराज होता. या रागातूनच त्याने भरदिवसा पत्नीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. मात्र स्थानिकांची सतर्कता आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे महिलेचा जीवा वाचला आहे.

CCTV कैैद झाला थरार

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा  धक्कादायक प्रकार घडला आहे.  22 वर्षाच्या महिलेला तिच्या पतीने  पेटवले. हा सर्व थरार घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पहिलेच्या पतीने भर रस्त्यात तिला अडवून तिच्या अंगावर पेट्रोल टाकले यांनतर त्याने तिला पेटवून दिल्याचे CCTV  कॅमेऱ्यात दिसत आहे.

आगीच्या ज्वाळांमध्ये पेटणारी महिला मदतीची याचना करत रस्त्यावर धावत होती. त्यावेळी प्रत्यक्षदर्शीनीं प्रसंगावधानता दाखवत पाणी टाकून आग विजण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी आपल्या घरातून पाणी आणून ओतले आणि पीडित महिलेलेचे प्राण वाचवले. यानंतर आरोपी रईस घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिस रईसचा शोध घेत आहेत.

3 वर्षांपूर्वी झाले होते लग्न

रईस हा राजस्थानमधील अलीगंज छाबडामध्ये राहणारा आहे. तर पीडीतचे माहेर मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये आहे. 4 एप्रिल 2019 रोजी या दोघांचे लग्न झाले होते.

पीडित महिला तिच्या कुटुंबीयांशी मोबाईलवरून बोलताना नवरा संशय घेत असे. या संशयातून तिला मारहाण करत असे. नवऱ्याच्या मारहाणीला कंटाळून मार्च महिन्यात पीडित महिला भोपाळला आपल्या माहेरी परत आली. आणि इथेच राहू लागली.

सही देण्यासाठी बोलावले

दरम्यान, महिलेने  कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज केला होता. रईसने मंगळवारी तिला फोन करून, घटस्फोटाचे कागदपत्र ईमेल केले असून त्याची प्रिंट आऊट घेऊन स्वाक्षरी घेण्यासाठी बोलावले. रईसच्या सांगण्यानुसार ती त्याला भेटली. त्यावेळी पुन्हा एकदा रईसने पत्नीला आपल्यासोबत नांदण्याची जबरदस्ती केली. मात्र, महिलेने सोबत राहण्यास नकार दुिला. यामुळे रागाच्या भरात रईस याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पतीचा संशयी स्वभाव आणि रोज होणारी मारहाण यामुळे जगणे असह्य झाल्याचे पीडित महिलेने पोलिस तक्रारीत म्हंटले आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.