AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

High Court : प्रौढ जोडीदारांमधील लैंगिक संबंध ‘अशा’ प्रकरणात बलात्कार ठरू शकत नाहीत; केरळ हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निकाल

न्यायालयाने म्हटले आहे की, “दोन प्रौढ जोडीदारांनी स्वतःच्या इच्छेने ठेवलेले लैंगिक संबंध भले विवाहात परावर्तित होत नसले तरीही त्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही.

High Court : प्रौढ जोडीदारांमधील लैंगिक संबंध 'अशा' प्रकरणात बलात्कार ठरू शकत नाहीत; केरळ हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निकाल
सुशिक्षित महिला विभक्त पतीकडे पोटगी मागू शकत नाहीImage Credit source: tv9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jul 09, 2022 | 2:46 AM
Share

केरळ : दोन प्रौढ जोडीदारांमध्ये संमतीने करण्यात आलेले लैंगिक संबंध (Sexual Relation) हे बलात्कार ठरू शकत नाहीत. अशा संबंधात आयपीसीच्या कलम 376 च्या कक्षेत येणार्‍या बलात्काराचा गुन्हा (Rape Case) दाखल करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल केरळच्या उच्च न्यायालया (Kerala High Court)ने दिला आहे. जोपर्यंत फसवणूक करून लैंगिक संबंधासाठी संमती प्राप्त केल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत अशा लैंगिक संबंधांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या खंडपीठाने 29 वर्षीय वकिल नवनीत एन नाथला जामीन मंजूर करताना हे निरीक्षण नोंदवले.

लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर विविध ठिकाणी केला होता बलात्कार

29 वर्षीय आरोपी वकिल नवनीत एन नाथ याने एका महिला वकिलाला लग्नाचे आश्वासन दिले होते. हेच आमिष दाखवून त्याने एका वकील महिलेवर विविध ठिकाणी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने लैंगिक संबंध ठेवल्यानंतर लग्नाच्या आश्वासनातून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या स्त्रीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या प्रकरणातील फिर्यादीने आरोप केला की, आरोपीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. नाथ हा उच्च न्यायालयात केंद्र सरकारचा स्थायी वकील आहे. त्याला 23 जून रोजी आयपीसी कलम 376(2)(एन) आणि 313 अंतर्गत अटक करण्यात आली होती.

वचन मोडले म्हणून आधीचे शारीरिक संबंध बलात्काराचा गुन्हा ठरू शकत नाहीत

या प्रकरणात निकाल देताना केरळ उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण मते व्यक्त केली आहेत. न्यायालयाने म्हटले आहे की, “दोन प्रौढ जोडीदारांनी स्वतःच्या इच्छेने ठेवलेले लैंगिक संबंध भले विवाहात परावर्तित होत नसले तरीही त्या लैंगिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही. दोघांनी परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवलेले असतील आणि जर नंतर लग्नास नकार देणे किंवा नातेसंबंध लग्नाच्या आड येणे हे प्रकार लग्न होऊ देत नसतील, तर आधीच्या शारीरिक संबंधांना बलात्कार ठरवता येणार नाही. लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपीला बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावता येऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायालयाने नोंदवलेली महत्वपूर्ण निरीक्षणे

– स्त्री आणि पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध केवळ स्त्रीच्या इच्छेविरुद्ध किंवा स्त्रीच्या संमतीशिवाय किंवा सक्तीने किंवा फसवणूक करून संमती मिळाल्यावरच बलात्कार ठरू शकतात.

– लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंधांना मिळवलेली संमती ही केवळ त्याचवेळी बलात्काराच्या रूपात असेल, ज्यावेळी वचन चुकीच्या विश्वासाने दिले गेले असेल किंवा फसवणूक केली गेली असेल किंवा शारीरिक संबंध ठेवण्याच्या वेळी त्या वचनाचे पालन करण्याचा हेतू नसेल.

– लग्नाच्या वचनाचे पालन न केल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंधांचे बलात्कारात रूपांतर करण्यासाठी लैंगिक कृत्यात सहभागी होण्याचा निर्णय स्त्रीच्या वचनावर आधारित असणे आवश्यक आहे.

– बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी सांगितलेल्या वचनाने स्त्रीला शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त केलेले असावे. शारीरिक मिलन आणि लग्नाचे वचन यांच्यात थेट संबंध असणे आवश्यक आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...