मोठी बातमी! MPSC ने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पुढे ढकलली, नवी तारीख काय?
हाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 3 ऑक्टोबर 2026 पासून आयोजित केलेल्या विविध मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

सचिन गव्हाने, टीव्ही 9 मराठी, मुंबई : सध्या राज्यात स्पर्धा परीक्षांचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आतापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षांत घोटाळा झाला आहे, असा आरोप विद्यार्थी करत आहेत. एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या अनेक परीक्षांमध्येही पेरफुटी झाली असून आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे, अशी मागणी विद्यार्थी तसेच विरोधक करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी या कथित घोटाळ्यांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही केली जात आहे. दरम्यान, आता एकीकडे एमपीएससीवर हे आरोप केले जात असताना आता दुसरीकडे एमपीएससीने मोठा एक महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससी आयोगाने नेमका काय निर्णय घेतला?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 3 ऑक्टोबर 2026 पासून आयोजित केलेल्या विविध मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून, परीक्षा पद्धतीबाबत राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीही लवकरच अपेक्षित आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यार्थी संघटना, पालक आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आयोगाने ‘राज्य सेवा मुख्य परीक्षा-2026’, ‘महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-2026’ आणि ‘महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-2026’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या जाणार
या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी आयोगाने नव्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा आम्ही लवकरच स्वतंत्रपणे जाहीर करून असे आयोगाने म्हटले आहे
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
