AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, अंबाझरी पोलिसांकडून आरोपी अटक

घरी आल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या बहणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी निलेश हेडाऊ असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली.

Nagpur Crime : नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार, अंबाझरी पोलिसांकडून आरोपी अटक
नागपूरमध्ये नोकरीचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचारImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 08, 2022 | 8:04 PM
Share

नागपूर : नोकरीचे आमिष दाखून 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या एका आरोपीच्या अंबाझरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निलेश असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर अत्याचार आणि धमकी (Threaten)चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीशी ओळख करुन तिला आपल्याकडे नोकरी असल्याचे सांगितले. तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी जायचे आहे सांगून भेटायला बोलावले आणि भंडारा येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर घरी नेऊन पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी देत तिला बसस्टँडवर सोडून दिले. यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

आधी तरुणी ओळख केली, मग नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला

अंबाझरी येथे राहणारी 24 वर्षीय तरुणी नोकरीच्या शोधात बहिणीसह सीताबर्डी येथे आली होती. दोघी बहिणी मोर भवन बसस्थानकावर नोकरीबाबत चर्चा करत होत्या. त्याच्याजवळ उभ्या असलेल्या आरोपी नीलेशने त्यांचे बोलणे ऐकले आणि आपल्याकडे नोकरी असल्याचं आमिष त्यांना दाखवलं. स्वत:ची ओळख हॉटेल मालक अशी करून दिली. आरोपीने तरुणीकडून मोबाइल क्रमांकही घेतला. त्यानंतर आरोपीने तरुणीला फोन करून गणेशपेठ बसस्थानकावर बोलावले. तरुणी तेथे आल्यानंतर आरोपीने तिला सांगितले की, एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिज म्हणून जॉब आहे, त्याच्या मुलाखतीसाठी जायचे आहे. मग त्यानंतर तरुणीला भंडारा येथे घेऊन गेला आणि तेथे त्याने मुलीवर जबरदस्ती सुरू केली.

अंबाझरी पोलिसांकडून आरोपीला अटक

निलेशने तिला पुन्हा घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. रात्रभर ओलिस ठेवल्यानंतर आरोपीने तरुणीला गणेशपेठ बस स्टँडजवळ सोडून दिले. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला ठार मारीन असे धमकावत निघून गेला. घरी आल्यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार आपल्या बहणीला सांगितला. त्यानंतर तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपी निलेश हेडाऊ असल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक करण्यात आली. अंबाझरी पोलिसांनी निलेशला तात्काळ अटक केली. (Ambazari police arrested the accused in a case of assault on a young girl in Nagpur)

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.