Video: चाकणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला; एकाची प्रकृती गंभीर; घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून यात धनंजय कांडगे, धनंजय भोकरे व आदी गोपाळे अशी या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.

Video: चाकणमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला; एकाची प्रकृती गंभीर; घटना सीसीटीव्हीत कैद
चाकणमध्ये प्राणघातक हल्ला, एक गंभीर
महादेव कांबळे

|

May 22, 2022 | 5:29 PM

पुणेः खेड तालुक्यातील चाकण शहारामध्ये (Chakan City) तिघांवर प्राणघातक हल्ला (Attack) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (CCTV) झाली असून जुन्या वादातून हा हल्ला करण्यात आला असण्याची शक्यता व्यक्त वर्तवण्यात येत आहे. चाकण मार्केट यार्ड भागात आलेल्या 3 ते 4 हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून यात धनंजय कांडगे, धनंजय भोकरे व आदी गोपाळे अशी या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. यामधील एकाची प्रकृती गंभीर असून चाकण येथील खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला करून आरोपी फरार झाले असून घटनेचा पुढील तपास चाकण चाकण पोलीस करीत आहे.

 

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये चाकण शहारात तिघांवर प्राणघातक हल्ला केला गेल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. ज्या वेळी हल्ला करण्यात आला त्यावेळची सर्व घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावरही घटना व्हायरल

ही घटना सीसीटीव्हीत कैद्य झाली आहे. या घटनेनंतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत.

सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती

चाकण मार्केट यार्ड भागात आलेल्या 3 ते 4 हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून या हल्ल्यात धनंजय कांडगे, धनंजय भोकरे व आदी गोपाळे अशी या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तीन व्यक्तींची नावे आहेत. यामधील एकाची प्रकृती गंभीर असून चाकण येथील खाजगी रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले आहे. हा हल्ला करून आरोपी फरार झाले असून घटनेचा पुढील तपास चाकण चाकण पोलीस करीत आहे.

जुन्या वादातून जीवघेणा हल्ला

या घटनेनंतर पोलिसांनी माहिती काढली असता जुन्या वादातून ही प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें