सेलूच्या डॉक्टरांची चिठ्ठी, लातूर-परभणीतून घेतले 600 बटन! औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त

शहरात दर एक दिवसाआड खून आणि हाणारीची घटना समोर येते. किरकोळ काकरणावरून झालेले वाद आणि नशेखोरी या दोन प्रमुक कारणांमधून या घटना घडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्तांनी आता एनडीपीएस पथक स्थापन केले. या पथकाची संपूर्ण शहरात पाहणी सुरु आहे.

सेलूच्या डॉक्टरांची चिठ्ठी, लातूर-परभणीतून घेतले 600 बटन! औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 2:50 PM

औरंगाबादः डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी-विक्रीस बंदी असलेल्या नायट्रोसन (बटन) या नळेच्या गोळ्यांचा (Drug Pills) मोठा साठा एनीपीएसच्या पथकानं जप्त केला आहे. औरंगाबादमधील उस्मानपुरा पोलिसांनी (Osmanpiuura police) ही कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून आरोपींनी या गोळ्या सेलू येथील डॉक्टरांच्या चिठ्ठीवर आणण्याचे सांगितले. तसेच ही चिठ्ठी परभणी (Parbhani) आणि लातूर येथील ओळखीच्या मेडिकलवरून घेतल्याची कबुलीही दिली. त्यामुळे नशेच्या गोळ्या खरेदी आणि विक्रीचे हे रॅकेट मराठवाड्यात पसरलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार, परभणी, लातूर जिल्ह्यातील मेडिकलवालेही पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

कुठे झाली कारवाई ?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम धोंडू काळे आणि दीपक साहेबराव हिवाळे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी स्थापन केलेले एनडीपीएस पथक उस्मानपुरा हद्दीत गस्त घालीत असताना त्यांना बटन गोळ्यांची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने दर्गा चौकात सापळा रचला. संशयावरून राम काळे याला रोखले. त्याची झडती घेतल्यानंतर तब्बल 45 बटन गोळ्या आणि 1390 रुपये रोकड आढळली. त्याच्या चौकशीतून दीपर हिवाळेचं नाव समोर आलं. पथकानं त्यालाही घरातून ताब्यात घेतलं. तो एका कारमधून नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचं उघड झालं. त्याच्याकडून 555 गोळ्या आणि धारदार शस्त्र जप्त करण्यात आलं.

सेलूच्या डॉक्टरांची चिठ्ठी

आरोपी दीपकने सांगितलं की, परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका डॉक्टरांच्या प्रस्क्रिप्शनवरून महिलेच्या मेडिकलमधून या गोळ्या खरेदी केल्या. तसेच काही गोळ्या लातूर येथून खरेदी केल्या. तेथून आणलेल्या या गोळ्या चढ्या दराने विक्री करीत असल्याची कबुली आरोपींनी दिली.

हे सुद्धा वाचा

वाळूजमध्येही एकाला अटक

दरम्यान, अन्य एका कारवाईत वाळूज परिसरात एकाला नशेच्या गोळ्यांचा पुरवठा केल्या प्रकरणी अटक झाली. वाळूज पोलिसांनी जळगावच्या मेडिकल दुकानदाराला अटक केली होती. 04 जून रोजी ही कारवाई झाली असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मोहम्मद अल्ताफ निसार शेख असं अटक केलेल्या अरोपीचं नाव आहे.

नशेखोरीला लगाम, पोलिसांसमोर आव्हान

औरंगाबादमधील वाढत्या नशेखोरीला आळा घालण्याचं मोठं आव्हान सध्या औरंगाबाद पोलिसांसमोर आहे. शहरात दर एक दिवसाआड खून आणि हाणारीची घटना समोर येते. किरकोळ काकरणावरून झालेले वाद आणि नशेखोरी या दोन प्रमुक कारणांमधून या घटना घडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेच पोलीस आयुक्तांनी आता एनडीपीएस पथक स्थापन केले. या पथकाची संपूर्ण शहरात पाहणी सुरु आहे. दौलताबादपासून नारेगावपर्यंत, उस्मानपुरा, सिटी चौक, जिन्सी, एआयएडीसी वाळू भागात पोलिसांच्या कारवाया सुरु आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.