Aurangabad : दीड वर्षांच्या बाळानं बाथरुमचा दरवाजा बंद केला, आतमध्ये लॉक, आईचा जीव वरखाली, पुढे जे घडलं, ते…

Aurangabad News : अग्निशमन दलाच्या जवानांनी हा मुलगा बाथरुममध्ये अडकल्याचं पाहिलं. घरात गेल्यानंतर आता या मुलाला बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न होताच.

Aurangabad : दीड वर्षांच्या बाळानं बाथरुमचा दरवाजा बंद केला, आतमध्ये लॉक, आईचा जीव वरखाली, पुढे जे घडलं, ते...
काळजाचा ठोका चुकवणारी घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 10:33 AM

औरंगाबाद : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. म्हणून जरा डोळा चुकला, की लहान मुलं एकापेक्षा एक करामती करुन ठेवतात. अशी एक घटना औरंगाबादेत (Aurangabad News) घडली. एका अवघं दीड वर्षांचं बाळ बाथरुमध्ये लॉक झालं. आई या दीड वर्षांच्या बाळाला अंघोळ (Child locked in Bathroom) घालत होता. बाथरुममध्ये अंघोळ घालून झाल्यावर आई बाहेर आली. खेळण्याच्या नादात दीड वर्षांच्या बाळानं बाथरुमचा दरवाजा आतून बंद करुन घेतला. ही बाब आईच्या लक्षात येताच मोठी घाबरगुंडी उडाली. आता काय करायचं? असा प्रश्न आईला पडला होता. बराच वेळ हे बाळ बाथरुमच्या (Child Rescued) आतमध्ये अडकून पडलं होतं. आता त्याला बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न आईला पडला होता. यानंतर जे घडलं ते थरारक होतं.

थोडक्यात अनर्थ टळला

चिमुरड्यानं दरवाजा आतून बंद केल्यामुळे तो उघडावा कसा, प्रश्न होता. शिवाय दरवाजा तोडायचा म्हटलं, तरी बाळाला लागण्याची भीती होती. अखेर काय करावं, हे आईला सुचेनासं झालं. अखेर याबाबत अग्निशमनच्या जवानांना माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केलं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी हा मुलगा बाथरुममध्ये अडकल्याचं पाहिलं. घरात गेल्यानंतर आता या मुलाला बाहेर कसं काढायचं, असा प्रश्न होताच. अखेर बाथरुमच्या खिडकीतून मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी आधी अग्निशमन दलाच्या जवानांना मोठी कसरत करावी लागणार होती.

हे सुद्धा वाचा

शिडीची मदत

शिडीच्या मदतीने अग्निशमनचे जवान बाथरुमच्या खिडकीपर्यंत पोहोचले. यानंतर त्यांनी बाथरुमची खिडकी तोडली आणि दीड वर्षांच्या बाळाची सुखरुप सुटका केली. यानंतर आईचा जीव भांड्यात पडला. मुलाची सुटका होईपर्यंत आईचा जीव कासावीस झाला होता. बराच वेळ हे बाळ बाथरुमध्ये अडकल्यानं चिंता व्यक्त केली जात होती. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांमुळे या बाळाची सुखरुप सुटका करण्यात यश आलं. यामुळे आईने अग्निशमन दलाचे आभार मानलेत.

पालकांनो, अजिबात दुर्लक्ष नको!

अनेक लहान मुलं पालकांचा डोळा चुकवून चित्र विचित्र गोष्ट करतात. कधी घरातच स्वतःला लॉक करु घेतात. कधी आई वडिलांना लॉक करतात. कधी खिडक्यांचे गज बंद करुन घेतात. कधी ग्रिलमध्ये अडकतात. एकापेक्षा एक करामती लहान मुलांकडून होतच असतात. पालकांना सुचणारही नाही, अशा गोष्टी लहान मुलांकडून होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे पालकांनी अधिक सतर्क राहणं आणि मुलांवर बारीक लक्ष ठेवणं, याला पर्याय नाही.

घरात लहान मुल असेल तर सगळ्यांनी अधिक काळजी घेणं आणि खबरदारी बाळगणं हे त्यामुळे नितांत गरजेचं आहे. अन्यथा थोडीशी चूकही फार महागात पडू शकते.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.