AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, जिल्हा परिषद शिक्षकाकडून तिसरीतील पाच मुलींचा विनयभंग, मुली रडत रडत आल्या अन्…

Crime News: बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील प्रकरण समोर आले. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून सहा वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्या प्रकरणानंतर वानवडी पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी याला अटक केली. आता अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकाने विनयभंग केला.

धक्कादायक, जिल्हा परिषद शिक्षकाकडून तिसरीतील पाच मुलींचा विनयभंग, मुली रडत रडत आल्या अन्...
शाळेत मुली सुरक्षित आहेत का?
| Updated on: Oct 05, 2024 | 6:12 PM
Share

बदलापूर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचारी असणाऱ्या अक्षय शिंदे याने अत्याचार केला होता. त्या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. संतापलेल्या बदलापूरकरांनी अक्षय शिंदेला त्वरीत फाशी देण्याच्या मागणीसाठी रेले रोको केले होते. त्यानंतर अक्षय शिंदे एन्काऊंटर करण्यात आले. त्या प्रकरणाची धग अजूनही कायम असताना जिल्हा परिषदेच्या शाळेत पाच मुलींचा विनयभंग करण्यात आला. ज्या शिक्षकांकडे पालक आपल्या मुलांना सोडून बिनधास्त राहतात, ज्या शिक्षकाला गुरु म्हटले जाते, त्यानेच हा प्रकार केला. शिक्षकाने केलेल्या या प्रकारानंतर मुली रडत रडत घरी आल्या अन् काय घडले ते पालकांना सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील या घटनेनंतर पुन्हा समस्त पालकवर्ग चिंतत आला आहे. बाळशीराम यशवंतराव बांबळे असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

काय घडला प्रकार

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात खराडी जिल्हा परिषद शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी बाळशीराम यशवंतराव बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले. दुपारच्या सुट्टीत एक मुलगी रडत रडत घरी गेली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. या प्रकारे इतर चार ते पाच मुलींबरोबरही बाळशीराम बांबळे या शिक्षकाने असभ्य वर्तन केले होते. मुख्यध्यापकांनी त्या सर्व मुलींना बोलवून चौकशी केली. त्यांनी त्या शिक्षकाच्या कारनाम्याचा पाढा वाचला. त्यानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शाळेत रुजू झाल्यापासून असा प्रकार

वर्गशिक्षक बाळशीराम यशवंतराव बांबळे हे शाळेत नव्याने रूजू झाले. ते शाळेत आल्यापासून असे प्रकार करत आहेत. याबाबत मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारी उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी शाळेतील या शिक्षकाविरुद्ध बीएनएस कलम ७४,७५, बालकांचे लैंगिक अत्याचार कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख करत आहेत.

दोन महिन्यात तिसरी घटना समोर

बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी पुणे शहरातील प्रकरण समोर आले. पुण्यात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या चालकाकडून सहा वर्षाच्या शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. त्या प्रकरणानंतर वानवडी पोलिसांनी संजय जेटींग रेड्डी याला अटक केली. आता अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकाने विनयभंग केला. यामुळे शाळेतही अल्पवयीन मुली सुरक्षित नाही, हे दिसून येत आहे. दोन महिन्यात तिसरी अशी घटना समोर आली आहे. यामुळे मुलींच्या पालकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.